06/06/2025

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलच्या करमाळा तालुकाध्यक्ष पदी सुनील अवसरे यांची निवड

0
IMG-20241031-WA0034.jpg

जेऊर, दि. ३१ (करमाळा-LIVE)-
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या करमाळा तालुका ओबीसी सेल च्या तालुकाध्यक्ष पदी सुनील अवसरे यांची निवड करण्यात आली आहे.आज अकलूज येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.यावेळी माजी आमदार नारायण आबा पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र पाटील, सोलापूर जिल्हा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अरुणजी तोडकर, करमाळा तालुकाध्यक्ष संतोष वारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील अवसरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून करमाळा तालुका ओबीसी सेलच्या करमाळा तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.नूतन तालुकाध्यक्ष सुनील अवसरे हे जेऊर येथील रहिवासी असून हरिओम मशनरी या दुकानाचे मालक आहेत. सामाजिक कार्यात त्यांचा नेहमीच सहभाग असतो, त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांची ही निवड करण्यात आली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page