माढ्याच्या ३६ गावांवर ठरणार यंदाचा करमाळ्याचा आमदार ; आबा पाटलांना ३६ गावातून उस्फुर्त प्रतिसाद- शिंदे गटाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता

करमाळा, दि. १७ (गौरव मोरे)-
विधानसभेची निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली असून करमाळा मतदारसंघात असलेल्या माढा तालुक्यातील ३६ गावांवर यंदाचा आमदार ठरणार आहे.
करमाळा विधानसभेसाठी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाटील-शिंदे-बागल यांच्यात निवडणूक होत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी आमदार नारायण आबा पाटील, अपक्ष म्हणून विद्यमान आमदार संजयमामा शिंदे तर शिवसेना शिंदे गटातून मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय बागल अशी पारंपरिक गटांमध्ये लढत होत आहे.

२००९ ला करमाळा विधानसभेची पुनर्रचना झाली आणि माढा तालुक्यातील ३६ गावांचा करमाळ्यात समावेश करण्यात आला. गेल्या तीन निवडणुकांमध्ये या ३६ गावांमधील मतदान निर्णायक ठरलेले आहे. २००९ मध्ये राष्ट्रवादीकडून तत्कालीन आमदार श्यामल बागल, २०१४ ला माजी आमदार नारायण आबा पाटील तर २०१९ ला विद्यमान आमदार संजयमामा शिंदे विजयी झाले आहेत. यात ३६ गावांमधील मतदान निर्णायक ठरलेले आहे.
२०१९ विधानसभा निवडणूकीत पुरूष १६०७३० तर महिला १४२०८४ असे एकूण ३०२८१६ मतदार होते पैकी पुरूष ११६२९८ तर महिला ९६९६७२ असे एकूण २१५१५८ मतदान झाले याची एकूण टक्केवारी ७१.०५% होती. यात आमदार संजयमामा शिंदे यांना ७८८२२ मते, माजी आमदार नारायण आबा पाटील यांना ७३३२८ मते तर रश्मी बागल यांना ५३२९० मते मिळाली होती तर १५९७ मते नोटाला मिळाली होती. यात आमदार संजयमामा शिंदे ५४९४ मतांनी विजयी झाले होते.
२०१९ विधानसभा निवडणुकीत आमदार संजयमामा शिंदे यांना करमाळ्यातील ११८ गावांमधून ३८१३६ मते मिळाली होती तर माढ्यातील ३६ गावांमधून ३९९८७ मते तर पोस्टल ६९९ असे एकूण ७८८२२ मते मिळाली होती.
माजी आमदार नारायण आबा पाटील यांना करमाळ्यातील ११८ गावांमधून ६३२४७ मते मिळाली होती तर माढ्यातील ३६ गावांमधून ९३८४ आणि ६९७ पोस्टल असे एकूण ७३३२८ मते मिळाली होती.
शिवसेनेकडून लढलेल्या रश्मी बागल यांना करमाळ्यातील ११८ गावांमधून ४३५९९ मते तर माढ्यातील ३६ गावांमधून ९३१६ मते तर ३८० पोस्टल मते असे एकूण ५३२९५ मते मिळाली होती.
२०२४ विधानसभेला करमाळा मतदारसंघात- करमाळ्यातील ११८ गावातून पुरूष ११८७४५ तर महिला १०७८११ असे एकूण २२६५५९ मतदार असून माढा तालुक्यातील ३६ गावात पुरूष ५१७७३ तर महिला ४८२७९ असे एकूण १०००६० मतदार आहेत. एकंदरीत करमाळा मतदारसंघात पुरूष १७०५१८ तर महिला १५६०९० असे ३२६६१९ मतदार आहेत.
परंतु सध्याची परिस्थिती बदललेली असून संजयमामा यांना २०१९ ला जरी जास्त मताधिक्य माढ्यातून मिळालेले असले तरी यावेळी चित्र वेगळे पहायला मिळत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लढत असलेले नारायण आबा पाटील यांना चांगला प्रतिसाद मिळत असून मागच्यावेळी पेक्षा यावेळी जास्त मताधिक्य मिळण्याची शक्यता असून तसे वातावरणही तयार झालेले असून आबा पाटलांना ३६ गावांमध्ये चांगलाच प्रतिसाद मिळत असल्यामुळे शिंदे गटाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ३६ गावांवर निर्णायक लढत होणार आहे.
करमाळ्यात पुन्हा एकदा पारंपरिक प्रतिस्पर्धी बागल-शिंदे-पाटील यांच्यात तिरंगी लढत होत आहे. २०१९ ला हेच पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांविरोधात लढले होते. २०१९ प्रमाणे आमदार संजयमामा शिंदे यांना सफरचंद हे निवडणूक चिन्ह मिळालेले आहे तर रश्मी बागल यांच्या ऐवजी दिग्विजय बागल निवडणूक लढवित असून २०१९ प्रमाणे यावेळीही धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. तर नारायण आबा पाटील यावेळी तुतारी वाजणारा माणूस हे चिन्ह घेऊन निवडणूक लढत आहेत.

यावेळी विधानसभेला सत्तांतर होण्याची शक्यता असून मविआ कडून लढणारे नारायण आबा पाटील यांचे पारडे जड असून नारायण आबा पाटील पुन्हा एकदा विधानसभेवर निवडून जाण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे २०१९ ला निसटता पराभव झालेला, गेल्या पाच वर्षांत चांगला जनसंपर्क, पाच वर्षातील ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये मिळालेले मतदान, लोकसभा निवडणूकीत खासदार मोहिते-पाटील यांना मिळालेले ४२ हजारांचे मताधिक्य तसेच स्वगृही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश, खासदार शरद पवार यांच्याबबद्दल ची सहानुभूती, मोहिते-पाटील यांचा पाटलांना पुन्हा एकदा सपोर्ट, माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी दिलेला पाठिंबा, करमाळ्यातील सावंत गटाचा पाठिंबा यामुळे माजी आमदार पाटील यांचा विधानसभेचा मार्ग सध्या सुसाट पहायला मिळत आहे.
वर्तमान इतिहास पहायचा झाला तर
सध्या विद्यमान आमदार संजयमामा शिंदे (अपक्ष), दिग्विजय बागल (शिवसेना-शिंदे गट), मविआ कडून नारायण आबा पाटील (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार) पक्षातून उमेदवारी जाहीर झालेली आहे. करमाळा विधानसभेसाठी १५ जण रिंगणात उभे आहेत.
महत्त्वाचे म्हणजे २०१४ प्रमाणे यावेळीही आमदार संजयमामा शिंदे यांच्या नावाचे दोन आणखी अपक्ष निवडणूक लढत आहेत. २०१४ लाही दोन अपक्ष उमेदवारांनी जवळजवळ २८०० मते घेतली होती, अन् संजयमामा शिंदे यांचा २३६७ मतांनी निसटता पराभव झाला होता.
यावेळी हे दोन उमेदवार किती मते घेणार हे बघण्यासारखे राहणार आहे. तर लोकसभेला भाजप मध्ये प्रवेश केलेले बागल यांनी करमाळा विधानसभेची जागा शिवसेना शिंदे गटाला सुटल्यामुळे २०१९ प्रमाणे पुन्हा एकदा धनुष्यबाण चिन्हावर लढत आहेत. मागील दोन विधानसभेला विजयाची हुलकावणी मिळालेल्या बागलांना यावेळी जनता तारणार का हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे कारण बागल गटाची तालुकाभर असलेली नाराजी, महायुतीतून काही भाजप पदाधिकाऱ्यांनी आमदार संजयमामा शिंदे यांना पाठिंबा दिलेला असल्यामुळे बागलांसाठी ही निवडणूक सोप्पी राहिलेली नाही.
२००९ करमाळा विधानसभा मतदारसंघ
पुरूष मतदार- १३२००६
महिला मतदार- ११८५२१
एकूण मतदार- २५०५२७
*झालेले मतदान*-
पुरुष- ९०४८२
महिला- ७५३७०
एकूण- १६५८५२
टक्केवारी- ६६.५७%
*उमेदवारांना पडलेले मतदान*-
श्यामल बागल- ७०९४३
नारायण आबा पाटील- ४३१२६
जयवंतराव जगताप- २५४११
सुर्यकांत पाटील- १३८१५
*२०१४ करमाळा विधानसभा निवडणूक*
पुरुष मतदार- १४९७६९
महिला मतदार- १२९९९१
एकूण मतदार- २७९७६०
*झालेले मतदान*
पुरूष- ११००६७
महिला- ९१८३०
एकूण मतदान- २०३४६२
टक्केवारी- ७२.७३%
*उमेदवारांना पडलेले मतदान-*
नारायण आबा पाटील- ६०६७४
रश्मी बागल- ६०४१७
संजयमामा शिंदे- ५८३७७
जयवंतराव जगताप- १४३४८
*२०१९ करमाळा विधानसभा निवडणूक*-
पुरूष मतदार- १६०७३०
महिला- १४२०८४
एकूण मतदार- ३०२८१६
*झालेले मतदान*-
पुरूष- ११६२९८
महिला- ९६९६७२
एकूण मतदान- २१५१५८
टक्केवारी- ७१.०५%
*उमेदवारांना पडलेले मतदान-*
संजयमामा शिंदे- ७८८२२
नारायण आबा पाटील- ७३३२८
रश्मी बागल- ५३२९०
*२०२४ करमाळा विधानसभा मतदारसंघ*
एकूण मतदार-
करमाळ्यातील ११८ गाव-
पुरूष-११८७४५
महिला- १०७८११
एकूण- २२६५५९
माढा तालुक्यातील ३६ गावात-
पुरूष- ५१७७३
महिला- ४८२७९
एकूण- १०००६०
*करमाळा मतदारसंघात*-
पुरूष- १७०५१८
महिला- १५६०९०
*एकूण -३२६६१९ मतदार*




