07/06/2025

कुंभेज : संघर्षातून मिळवलेले यश इतरांसाठी प्रेरणादायक- पैलवान आण्णासाहेब साळुंके

0
IMG-20241224-WA0050.jpg

शासकीय सेवेत नियुक्त कुंभेज येथील तरुणांच्या सन्मान समारंभात प्रतिपादन
.

करमाळा, दि. २४ (करमाळा-LIVE)-
कुंभेजच्या औदुंबर होशिंग याची न्यायालयीन लिपीक पदी निवड झाल्या बद्दल तसेच रोहित कन्हेरे याची बीएसएफ मध्ये निवड झाल्याबद्दल जय महाराष्ट्र मित्रमंडळाने या सन्मान समारंभाचे आयोजन केले होते.

औदुंबर अशोक होशिंगच्या निवडीचे वृत्त समजताच कुंभेज येथे कुटूंबीयांसह मित्र मंडळींनी आनंद व्यक्त केला. नित्य सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या जय महाराष्ट्र तरुण मंडळाने सोहळ्याचे आयोजन केले होते.

याप्रसंगी उपस्थितांशी अनौपचारिक संवाद साधताना मंडळाचे अध्यक्ष आण्णासाहेब साळुंके म्हणाले की, शासनाच्या सेवेत जाणाऱ्या प्रत्येकाने सामाजिक बांधीलकी जपायला हवी. लाल मातीशी घट्ट नातं सांगणाऱ्या पैलवाना सारखंच शासकीय सेवेत जाणाऱ्या तरुणांनी गावाशी जोडलेली आपली नाळ तुटू देऊ नये. गावातील आपल्या अन्य मित्रांना मार्गदर्शन केल्यास अनेकांना शासकीय सेवेत जाण्यासाठी याचा फायदा होईल. ही एक प्रकारे समाजाची व गावाची सेवाच होईल. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या समारंभ प्रसंगी कुंभेज येथील सुरेश शिंदे, पोपट शिंदे, अशोक देशमुख, राजाभाऊ होशिंग, जलसंपदा विभागाचे अभियंता बालाजी माने, विदर्भ कोकण बँकेचे गणेश शिंदे, डॉ अर्जुन शिंदे, दादासाहेब शिंदे, आश्रु तोरमल, रमेश काळे, पैगंबर पठाण, अरविंद साळुंके, आण्णा कादगे, संतोष चांदणे, महेश काळे, संतोष घोरपडे, सुरज वसे, श्रीकांत काळे, ज्ञानेश्वर दुधे, आमिन पठाण, बबलू कन्हेरे, नाना कुलकर्णी, रवि काटे, प्रदीप कन्हेरे, समाधान कन्हेरे, तेजस मुटके, विष्णू होशिंग, निखिल काळे तसेच कुंभेज ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page