जेऊरच्या भारत प्रायमरी स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

जेऊर, दि. ४ (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील भारत प्रायमरी स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली.यावेळी भारत प्रायमरी मधील मुलींनी सावित्रीबाई सारखा पोशाख धारण केलेला होता. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सावित्रीबाई बनून आलेल्या मुलीं व देशमुख मॅडम व शिंदे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी या कार्यक्रमास संस्थेचे सचिव अर्जुनराव सरक, मुख्याध्यापक दीपक व्यवहारे उपस्थित होते. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्यावर गौरव पर असणारे गीत सादर करण्यात आले व त्यावर इयत्ता चौथी व तिसरीतील मुलींनी नृत्य सादर केले. तसेच यावेळी मुलींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी भाषणे केली.यावेळी भारत महाविद्यालयाचे प्रा. वसंतराव यादव यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यातून त्यांनी सावित्रीबाई फुले यांना आपल्या जीवनामध्ये मुलींसाठी शाळा काढल्यानंतर झालेला त्रास व त्यातूनही त्यांनी आपली चिकाटी सोडली नाही हे नमूद केले. तसेच यावेळी मुलींनीही भाषणे केले.यावेळी त्यांनी सावित्रीबाई फुले यांनी मुलांसाठी शाळा काढल्यामुळे आज आपण या ठिकाणी शिक्षण घेत आहोत. त्यामुळे सावित्रीबाई फुले यांचे विचार पुढे चालू ठेवणे गरजेचे आहे असे मुलींनी आवर्जून नमूद केले.आज सकाळपासूनच भारत प्रायमरीच्या परिसरामध्ये अनेक मुली सावित्रीबाईंच्या विषयांमध्ये साड्या घालून आल्यामुळे एक वेगळाच अनुभव येत होता.अमोल पाटील, नितीन पाटील, उत्तरेश्वर गरड, अनिता देशमुख, वर्षा शिंदे, किशोर गुळमे, गणेश हजारे, मॉन्टेसरीच्या मुमताज शेख, सरडे मॅडम या सर्व शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन पाटील यांनी केले.