प्रा. भिष्मा चांदणे यांचा यशकल्याणी संस्थेच्यावतीने सन्मान

करमाळा, दि. २३ (करमाळा-LIVE)-
शिक्षणाबरोबर सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल प्रा. भिष्मा चांदणे यांचा यशकल्याणी संस्थेच्यावतीने सन्मान करण्यात आला आहे.
प्रा.भिष्मा चांदणे हे करमाळा तालुक्यात दोन दशकांहून अधिक काळ शैक्षणिक क्षेत्रात योगदान देत आहेत. त्याचबरोबर ग्राहक पंचायतीचे कार्य करत सामाजिक योगदान देत आहेत. विविध वृत्तपत्रांतून प्रासंगिक व नियमित सदर लेखन करून संवेदनशील समाजासाठी जाणिव जागृती करण्याचे उदात्त कार्य करत आहेत नुकतेच त्यांना शिक्षक भारती या शिक्षक संघटनेचा जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात आला.
करमाळा तालुक्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील व प्राचार्य प्रवीण देशमुख यांनी प्रा. चांदणे यांचा सन्मान केला.
शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुजित काटमोरे, तालुकाध्यक्ष प्रा. विजयकुमार गुंड, सचिव प्रा. गाडेकर यांनी प्रा. भिष्मा चांदणे यांचे अभिनंदन केले.
यावेळी सोलापूर जिल्हा इंग्लिश टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा.बाळकृष्ण लावंड, करमाळा इंग्लिश टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष कल्याणराव साळुंके, सहसचिव प्रा.मारूती जाधव व असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.