07/06/2025

जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने संत तुकाराम महाराज यांची जयंती साजरी

0
IMG-20250203-WA0025.jpg

जेऊर, दि. ३ (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील संभाजी ब्रिगेड संपर्क कार्यालयात जगद्गुरु संत तुकोबाराय जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी बोलताना पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके म्हणाले की, आज तुकाराम महाराजांचे केवळ नाव घेऊन चालणार नाही त्यांचे विचार अंगिकारले पाहिजे कारण त्याच्या गाथेतील एक एक अभंग समाजातील रुढी, परंपरा व अंधश्रद्धा यांना गाढून विज्ञानाची कास धरायला लावतो.१६ व्या शतकातील महान क्रांतिकारक
संत तुकोबाराय यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील देहू या गावी दि.२ फेब्रुवारी १६०८ रोजी झाला.

।। नामदेवे रचिला पाया ।।
॥ तुका झालासे कळस ।।
महान क्रांतिकारक, विज्ञानवादी, समतावादी, संत श्रेष्ठ, शिवगुरू, तुकोबाराय यांच्या शिव तुझे नाव ठेविले पवित्र ! छञपती सुञ विश्वाचे की !! छञपती शिवाजी महाराजांना सर्वप्रथम “छञपती” संबोधले. तुकारामांचे वारकरी स्वराज्याचे वारकरी बनले.

चुकीच्या रूढी परंपरा यावर आपल्या अभंगातून आसूड ओढून समाज सुधारणा करणारे. जगतगुरू तुकाराम महाराजांनी जगात पहिल्यांदा शेतक-यांना कर्जमुक्ती केले. जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपले तोचि साधू ओळखावा देव तेथेच जाणावा. भुके नाही अन्न मेल्यावरती पिंडदान हे तो चाळवाचाळवी केले आपणाची जेवी. माय बाते अवघी काशी तेने न भजावे तीर्थशी तुका म्हणे माय बापे अवघी देवाची रूपे जर वाटते तुला कि हारला तुकोबा भक्तांनी अभंगातून तारला तुकोबा इतकाच फरक माझ्या तुझ्यात मित्रा तू मारला तुकोबा मी पेरला तुकोबा म्हणाले.

यावेळी उपस्थित पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके, आबा झाडे, पांडुरंग घाडगे, धन्यकुमार गारुडी, किशोर कदम, निलेश पाटील, अतुल निर्मळ, हेमंत शिंदे, आजिनाथ माने, अजित उपाध्ये, महेश कांडेकर, अविनाश घाडगे, पिंटू जाधव इत्यादी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page