करमाळ्यातील जलसंपदा विभागाच्या कार्यालयात आढळला किंग कोब्रा नाग

करमाळा, दि. १४ (करमाळा-LIVE)-
करमाळ्यातील जलसंपदा विभागाच्या भीमा उपसा सिंचन उपविभाग क्र-१ या उपविभागीय कार्यालयात इंडियन कोब्रा जातीचा नाग आढळून आल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.
करमाळा येथील जलसंपदा विभागाचे एकूण ५ उपविभागीय कार्यालय असून सर्व कार्यालये हे पडक्या अवस्थेत असून सदरच्या कार्यालयाचे बांधकाम हे स्वातंत्र्यानंतर काळातील आहेत. पाचही कार्यालयांमधील इमारत अत्यंत जीर्ण अवस्थेत असून खिडक्या व दरवाजे तसेच व भिंतीला तडे गेले आहे. त्यामुळे या सर्व कार्यालयात सरपटणारे प्राण्यांचा वावर असतो
बुधवारी १२ फेब्रुवारीला भीमा उपसा सिंचन उपविभाग क्र-१ कार्यालयात इंडियन किंग कोब्रा जातीचा नाग आढळून आला करमाळा येथील सर्पमित्र सागर टेकाळे यांनी तो नाग धरून निसर्गाच्या सान्निध्यात सोडला.
त्यामुळे भविष्यात काही धोका निर्माण होऊ नये म्हणून सर्व कर्मचाऱ्यांकडून नवीन बांधकाम करून कार्यालय सुरू करण्याची मागणी होत आहे.