10/06/2026

जेऊर येथील इरा पब्लिक स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

0
IMG-20250220-WA0008.jpg

जेऊर, दि. २० (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील न्यू इरा पब्लिक स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

प्रथमतः शिवरायांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आरुष लक्ष्मण शिरसकर या विद्यार्थ्याने शिवरायांची वेशभुषा परिधान केली होती. इयत्ता पहिलीच्या केतकी सारंग कुलकर्णी हिने जिजाऊंची वेशभूषा परिधान केली होती तर छोटा गट मधील पूर्वा राहुल चव्हाण हिने सईबाईंची वेशभूषा परिधान केली होती.

विद्यार्थ्यांनी शिवरायांचा इतिहास आपल्या वक्तृत्वाने सादर केला. काही विद्यार्थ्यांनी व विद्यार्थीनींनी शिवरायांच्या गाण्यावर लेझीम नृत्य सादर केले.

यावेळी घाडगे मॅडम यांनी शिवरायांचा इतिहास आपल्या वक्तृत्वाने सादर केला. मुख्याध्यापिका अपेक्षा अवसरे यांनी सूत्रसंचालन केले तर अश्विनी अवसरे यांनी आभार मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page