06/06/2025

करमाळ्यातील झाडं काढायला प्रशासनाला लागले तब्बल १४ तास ; नगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन झोपा काढतय का ?- भाजप उपाध्यक्ष सचिन चव्हाण

0
IMG-20250220-WA0020.jpg

करमाळा, दि. २० (करमाळा-LIVE)-
दत्त मंदिर समोर यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर काल रात्री एक झालं उन्मळून रस्त्यावर पडले होते.

त्यामुळे रात्रीपासून च एसटी बस आणि अवजड वाहनांची मोठी गैरसोय झाली होती. परंतु रात्री ८ वाजता पडलेले झाड १४ तासानंतर ते झाड तुकडे न करता जेसीबी च्या सहाय्याने उचलण्याचा केविलवाणा पर्यंत नगरपालिकेमार्फत केला गेला.

शहरामध्ये अचानक कोणती मोठी दुर्घटना घडल्यास नगरपालिकेमध्ये आपत्ती व्यवस्थापन आहे की नाही ??
नगरपालिका प्रशासनाने तातडीने नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन संपर्क नंबर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी भाजप शहर उपाध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page