स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने माढ्यात रक्तदान व अवयव दान संकल्प शिबीर संपन्न

करमाळा, दि. २६ (करमाळा-LIVE)-
माढा येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ६० व्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान व मरणोत्तर अवयव दान संकल्प शिबीर नुकतेच संपन्न झाले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राष्ट्रीय सेवा योजना माढा विभाग माढा आयोजित स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या ६० व्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान व मरणोत्तर अवयव दान संकल्प शिबिर मंगळवार दि.२५ फेब्रुवारीला भोसरे येथील के.एन.भिसे कॉलेज या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन माढा विभागीय समन्वयक प्रा. अनिल मुंगूसकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के.एन.भिसे आर्ट्स कॉमर्स अँड व्ही.पी.सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. अनुपमा पोळ तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सातव (नेत्ररोग तज्ञ वैद्यकीय अधिकारी कुर्डूवाडी) यांनी रक्तदान व मरणोत्तर अवयवदान संकल्प याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रम चे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अतुल कदम यांनी केले तर आभार कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॅ. सुभाष गायकवाड यांनी मानले या कार्यक्रमासाठी माढा विभागातील भारत महाविद्यालय जेऊर, प्रतापसिंह मोहिते-पाटील महाविद्यालय करमाळा, के. एन. भिसे आर्ट्स कॉमर्स अँड व्ही. पी. सायन्स कॉलेज कुर्डूवाडी, मा. ह. महाडिक महाविद्यालय मोडनिंब, कला व वाणिज्य महाविद्यालय माढा या पाच महाविद्यालयांनी सदर शिबिरात सहभाग नोंदवला.
या शिबीरात एकुण २६ जणांनी रक्तदान केले तसेच २५ विद्यार्थ्यांनी मरणोत्तर अवयव दान करण्याचा संकल्प केला.
या शिबीराच्या यशस्वीतेसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्र. कुलगुरू डॉ.लक्ष्मीकांत दामा, कुलसचिवा डॉ. योगिनी घारे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, जिल्हा समन्वयक डॉ. विरभद्र दंण्डे, के.एन.भिसे आर्ट्स कॉमर्स अँड व्ही. पी.सायन्स कॉलेज भोसरे महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ अनुपमा पोळ, विभागीय समन्वयक प्रा अनिल मुंगूसकर, सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार ब्लड बँक चे डॉक्टर व सर्व अधिकारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा डॉ. अतुल कदम, डॉ.सुभाष गायकवाड, प्रा. डॉ. दत्तात्रय काळेल, प्रा. सोमनाथ जाधव व माढा विभागातील सर्व स्वयंसेवक यांचे सहकार्य लाभले.