महापुरूषांची बदनामी केल्या प्रकरणी नागपूर येथील इसमावर कायदेशीर कारवाई करावी ; कारवाई न झाल्यास संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा

करमाळा, दि. २७ (करमाळा-LIVE)-
नागपूर येथील प्रशांत कोरटकर या व्यक्तीवर महापुरुषांची बदनामी, धार्मिक भावना दुखावणे, सामाजिक तेढ व जीवे मारण्याच्या धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्यावतीने करण्यात आली आहे.
प्रशांत कोरटकर (नागपूर) या व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन करुन छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व मांसाहेब जिजाऊ यांच्याबद्दल हिणकस व गलिच्छ वक्तव्ये करुन बदनामी केली आहे. तसेच संबंधित व्यक्तीने विकृत लेखक जेम्स लेन याने केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि मांसाहेब जिजाऊ यांच्याबद्दल अत्यंत विकृत लिखाणाचे समर्थन करुन तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत.
मराठा समाजाला शिवीगाळ करुन सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन सदर व्यक्तीने ही वक्तव्ये व धमकी देत असल्याने हे प्रकरण संवेदनशील आहे.
प्रशांत कोरटकर या व्यक्तीने संबंधित ऑडिओ कॉलमध्ये पुढील वक्तव्ये केली आहेत. १) ब्राम्हणांच्या शासनात तुम्ही काम करत आहे हे लक्षात ठेवा. २) बाजीप्रभू नसते तर तुमचा महाराज जीवंत नसता ३) तुमचे महाराज पळून गेले ४) जेम्स लेनचे पुस्तक वाचा, लोकांना सांगा जेम्स लेनने काय म्हटले आहे व्हू इज बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी, हे लोकांना सांगा ५) ब्राम्हणांना कमी समजू नका, तुम्हाला ब्राम्हणांची ताकत दाखवतो, मग तुम्ही कितीही मराठे एकत्र करा. ६) छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचवणारा भालजी पेंढारकर हा ब्राम्हण होता, नाहीतर तुमचा छत्रपती कुठे गेला असता माहित पडलं नसतं ७) रेकॉर्ड कर तुझ्या बापाला, ब्राम्हणांना बोलशील ना तर तुझी मारुन टाकेन ८) ज्या दिवशी ब्राम्हणांचा शब्द काढशील त्या दिवशी परशुरामाचा परशू तुझ्या घुसवील ९) तुला तिथ येऊन मारीन. १०) तुला घरात येऊन मारीन
सदर ऑडिओ कॉल रेकॉडॉग https://www.facebook.com/share/v/१५sdFaan१G/ या लिंकवर (Indrajit Sawant यांच्या फेसबुक वॉलवर) उपलब्ध आहे.
राज्य सरकार, गृह विभाग व पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन प्रशांत कोरटकर (नागपूर) या व्यकतीवर तात्काळ गुन्हा दाखल करुन त्याला अटक करावी आणि त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी. या प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करुन घेण्यात किंवा कारवाई करणयाबाबत गांभीर्य दाखवले नाही तर संभाजी ब्रिगेड व सर्व शिवप्रेमीच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन करुन अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिल्या जातील हे लक्षात घ्यावे.
निवेदन स्विकारताना पोलिस निरीक्षक विनोद घुगे, सचिन काळे औदुंबर राजे भोसले, संदीप तळेकर सुहास पोळ, नितीन खटके, अतुल निर्मळ, सचिन पोळ, अर्जुन नाईकनवरे, राज झिंजाडे, गणेश कुकडे, सुनिल भोसले, ज्ञानेश्वर लगड, राजेंद्र भोसले, मनोहर कोडलिंगे इत्यादी उपस्थित होते.