आदिनाथ कारखाना निवडणूक : पाटील गटाने संधी दिल्यास केम गटातून लढण्यास तयार- अप्पासाहेब चौगुले

जेऊर, दि. १५ (करमाळा-LIVE)-
विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी संधी दिल्यास केम गटातून आदिनाथ ची निवडणूक लढणार असल्याचे मत ढोकरी चे ग्रामपंचायत सदस्य अप्पासाहेब शिवाजी चौगुले यांनी व्यक्त केले आहे.
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झालेली असून आमदार नारायण आबा पाटील यांच्यावर तालुक्यातील जनतेचा विश्वास असून नारायण आबाच आदिनाथ सक्षमपणे चालवू शकतात, तसेच कर्मयोगी गोविंदबापूंनी आदिनाथ साठी योगदान दिलेले आहे.
आमदार नारायण आबा यांनी संधी दिल्यास आपण केम गटातून निवडणूक लढण्यासाठी तयार आहोत असे मत श्री चौगुले यांनी व्यक्त केले आहे.