06/06/2025

आमदार आबा पाटील यांची खंबीर भूमिका ; दहिगावं उपसा सिंचनाचे उन्हाळी आवर्तन सुरू

0
IMG-20250320-WA0039.jpg

करमाळा, दि. २० (करमाळा-LIVE)-
दहिगावं उपसा सिंचन योजनेच्या रब्बी आवर्तनातून तालुक्यातील शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपयांचे पिक उत्पादन घेता आले, उन्हाळी आवर्तनातून चालू पिकांची जोपासना होणार असल्याचे मत युवानेते जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केले.

काल गुरूवार पासून दहिगावं उपसा सिंचन योजनेच्या उन्हाळी आवर्तनाचे पंप सुरु झाले. दहिगावं येथील पंप हाऊस एक मध्ये आज उन्हाळी आवर्तनासाठी जेऊरचे सरपंच तथा आमदारपुत्र पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते कळ दाबून पंप सुरु करण्यात आले.

यावेळी पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता आवटे साहेब, शाखा अभियंता सौंदणे साहेब, चिखलठाणचे सरपंच विकास गलांडे, दहिगावचे सरपंच संजय गलांडे, माजी जि प सदस्य बिभीषण आवटे, माजी पं.स सदस्य गणेश चौधरी, माजी सरपंच जोतीराम नरुटे, सोसायटी माजी चेअरमन सुरेश नरुटे, प्रगतशील बागायतदार राहुल गोडगे, शेटफळचे उपसरपंच अजित नाईकनवरे, बिभिषण पवार, माजी सरपंच मारुती पवार, भीमराव घाडगे-पाटील, विक्रम पवार आदी उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत पाटबंधारे विभागाचे स्टाफ कडून करण्यात आले.

यावेळी बोलताना पृथ्वीराज पाटील म्हणाले की, रब्बी आवर्तन वेळेवर दिल्याने पूर्व भागातील शेतातील गहु, हरभरा, उडीद, कांदा यासह केळी सारख्या नगदी पिकांना जीवदान मिळाले. आमदार नारायण आबा पाटील यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेतलेल्या खंबीर भुमिकेमुळेच आज या महिनाभरात कुकडी, दहिगावं उपसा सिंचन योजना, मांगी मध्यम प्रकल्प, भीमा सीना बोगदा व सीना माढा उपसा सिंचन योजनेचे पाणी शेतकऱ्यांना मिळाले. आता उन्हाळी आवर्तनात सुध्दा पुर्व भागातील चारीच्या तांत्रिक अडचणी नसलेल्या सर्व गावांना पाणी दिले जाणार आहे. शिवाय नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई तसेच गुरांच्या चारा टंचाईच्या बाबतीतही या योजनेतून शक्य तेथे पाणी द्यावे अशी सुचनाही आमदार नारायण आबा पाटील यांनी संबंधित विभागास दिली असल्याचे पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.

उपस्थितांचे आभार शाखा अभियंता घोडेस्वार यांनी मानले. उप अभियंता राजगुरू यांच्या देखरेखीखाली व त्यांनी आखलेल्या नियोजनानुसार
हे आवर्तन चालू झाले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page