17/04/2026

वाशिंबे येथील अॕड योगेश झोळ यांना बार कौन्सिलची सनद ; देशभरातील न्यायालयात करता येणार वकिली

0
image_editor_output_image1030193948-1742721915166.jpg

केत्तूर, दि. २३ (करमाळा-LIVE)-
वाशिंबे येथील ॲड योगेश झोळ यांना ऑल इंडिया बार कौन्सिलची सनद मिळाली असून त्यामुळे त्यांचा देशभरातील कोणत्याही न्यायालयामध्ये वकिली करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अॕड योगेश झोळ हे करमाळा तालुक्यातील वाशिंबे या गावातील प्रगतशील शेतकरी भास्कर झोळ यांचे चिरंजीव आहे. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण वाशिंबे येथील शरदचंद्रजी पवार विद्यालयामध्ये झाले आहे तसेच वकिलीचे शिक्षण यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय पुणे येथून झाले आहे. सध्या ते शिवाजीनगर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालय पुणे येथे प्रॅक्टिस करत आहेत. ऑल इंडिया बार कौन्सिलच्या वतीने घेण्यात आलेल्या व कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत त्यांनी अत्यंत चांगले गुण मिळवून यश संपादन केले आहे.

त्यामुळे त्यांचे विविध स्तरातून कौतुक होत असून अभिनंदन केले जात आहे.।

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page