जेऊरच्या जिनियस अबॅकस मधील गुणवंतांचा यशकल्याणी संस्थेकडून सन्मान

जेऊर, दि. २८ (करमाळा-LIVE)-
जेऊरच्या जिनियस अबॅकस मधील गुणवंतांचा यशकल्याणी संस्थेकडून सन्मान करण्यात आला आहे.
पुणे येथे झालेल्या प्रो ऍक्टिव्ह अबॅकस द्वारे ८ जानेवारी २०२५ ला गणेश कला क्रीडा मंडळाच्या नॅशनल अबॅकस स्पर्धेत विविध राज्यातील एकूण पाच हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या परीक्षेत जेऊर शहरातील जिनियस अबॅकस क्लासेसच्या एकूण २५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या सर्वच विद्यार्थ्यांनी या परीक्षेत उत्तुंग यश मिळवले आहे.
रिजनल अबॅकस परीक्षेत तेजस्विनी भिलारे हिने सहा मिनिटात शंभर गणिते अचूक सोडून प्रथम क्रमांक तर श्रीजय मदने याने ९८ गणिते सोडवून द्वितीय क्रमांक मिळवला तसेच वेदांत गोडगे द्वितीय क्रमांक, प्रांजली भिलारे द्वितीय क्रमांक, जान्हवी शहा तृतीय क्रमांक, श्रेया मारकड चतुर्थ क्रमांक, श्रुतिका पोटे चतुर्थ क्रमांक, श्रेया पोटे चतुर्थ क्रमांक व अंजली भिलारे पाचवा क्रमांक मिळवून यश मिळविले आहे. तसेच ९ विद्यार्थ्यांची कोल्हापूर येथील इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धेत निवड होऊन २८ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या परीक्षेत ही यश प्राप्त झाले आहे. याबरोबर जिनियस अबॅकस क्लासचे अथर्व पोटे, स्नेहल पोटे, तेजस भिलारे, वैभव भिलारे, रीया चौगुले, श्रुती गुंडगिरे, अवनीश गुंड, मोहम्मद साद शेख, पृथ्वीराज वाघमोडे, उत्कर्ष मंजरतकर, तनिष्का राखुंडे, आराध्या वेदपाठक, उमेरा फकीर या सर्वांनी गोल्ड मेडल मिळून यश संपादन केले आहे.
या यशाबद्दल करमाळा येथील यशकल्याणी संस्थेच्या वतीने 22 मार्च सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अतुल दाभाडे, अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील, डॉ. निलेश मोटे, प्रा. विष्णू शिंदे, प्रा जयेश पवार, पत्रकार. सिद्धार्थ वाघमारे, डॉ.स्वाती बिले, राजकुंवर पाटील उपस्थित होते.
या कार्यक्रमात मुलांनी अबॅकस डेमोचे सादरीकरण केले यामध्ये तेजस्विनी भिलारे, वैभव भिलारे, श्रीजय मदने, प्रांजली भिलारे, अथर्व पोटे, श्रेया पोटे, श्रेया मारकड, वेदांत गोडगे यांनी अतिशय सुंदर डेमो सादरीकरण केले. तसेच तसेच जान्हवी शहा, तेजस भिलारे, श्रुती गुंडगिरे, तेजस्विनी भिलारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच डॉ. स्नेहल शहा, रेश्मा गोडगे, निशा मदने यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी राजकुंवर पाटील यांनी बोलताना सांगितले की, अत्यंत मुलांना वेळ देणं सध्याच्या परिस्थितीत गरजेचे आहे पालकांनी किमान मुलांना दोन तास वेळ हा दिला पाहिजे तसेच प्रा. करे- पाटील यांनी यावेळी मुलांचे कौतुक केले व गणित हा विषय महत्त्वाचा आहे दैनंदिन जीवन जगताना मुलांना गणित हा विषय प्रत्येक ठिकाणी येतो गणित विषया बरोबरच इतर स्पर्धा परीक्षा किती महत्त्वाच्या आहेत हे सांगितले.
जिनियस अबॅकस क्लासच्या संचालिका अंकिता वेदपाठक यांनी मुलांच्या यशाबद्दल क्लास तर्फे रायटिंग पॅड बक्षीस म्हणून दिले.
क्लासला सलग सातव्या वेळेस बेस्ट सेंटर अवार्ड मिळाल्याने क्लासला संचालिका व त्यांची कुटुंब यांचा यशकल्याणी संस्थेकडून सन्मान करण्यात आला. जेऊर भागामध्ये अबॅकस क्लासेस असूनही अबॅकस बरोबर फोनिकस क्लासेस ही नवीन संकल्पना अंकिता वेदपाठक यांनी आणली आहे. फोनिक्स क्लासेस चे उद्घाटन केले आहे तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व पालक विद्यार्थी व यशकल्याणी संस्थेचे सहकार्य मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अंकिता वेदपाठक यांनी केले.