06/06/2025

आदिनाथ कारखान्यास आर्थिक मदत मिळवून देऊन कारखाना उर्जित अवस्थेत आणण्यासाठी कटीबद्ध- आमदार नारायण आबा पाटील

0
IMG-20250410-WA0011.jpg

करमाळा, दि. १० (करमाळा-LIVE)-
आदिनाथ कारखान्यास आर्थिक मदत मिळवून कारखाना उर्जित अवस्थेत आणण्यासाठी कटीबद्ध असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले.

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आजी-माजी आमदारांचे पॅनल‌ एकमेकांच्या विरोधात लढत असुन शेटफळ ता करमाळा येथील श्री आदिनाथ कारखाना संजिवनी पॅनल’च्या प्रचार सभेत आमदार नारायण आबा पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे.

शेटफळ येथे पार पडलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी वयोवृध्द शेतकरी दशरथ लबडे होते तर यावेळी व्यासपीठावर मोहन पोळ, आदिनाथ माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, चिखलठाण सरपंच विकास गलांडे,अविनाश सरडे, विकास अमृळे, इन्नुस सय्यद,नवनाथ अवघडे, शहाबुद्दीन सय्यद, बाजार समिती माजी संचालक दादासाहेब लबडे,विलास आप्पा लबडे, अण्णासाहेब लबडे, भागवत गुंड, बाळासाहेब गुंड, नागनाथ साबळे, माजी उपसरपंच अजित नाईकनवरे, सतिष निंबाळकर,अरुण गुटाळ,
बाळासाहेब लबडे, सोमनाथ गुंड, बाळासाहेब गुंड,जयनाथ पोळ, नवनाथ गुटाळ, सोपानकाका निंबाळकर, भरत पोळ, अजिनाथ लबडे, विजय कोकरे, किसन नाईकनवरे, मुकुंद लावंड, बन्सीअण्णा चोरगे, तुकाराम नाईकनवरे, भिवाजी कळसाईत, नागनाथ गुंड, बापू, लोखंडे, वाघमारे सहदेव, धनाजी नाईकनवरे, शिवा साबळे, अजिनाथ कळसाईत, सुरेश घोगरे, मुकूंद पोळ दत्तात्रय गव्हाणे महादेव पोरे श्रीमान चौधरी राजाभाऊ कदम, हनुमंत सरडे, राजाभाऊ रोंगे महाराज ,डॉ कानगुडे आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार नारायण आबा पाटील म्हणाले की आदिनाथ कारखान्याच्या निधीसाठी मी स्वतः आमदार म्हणून शासनदरबारी पाठपुरावा करणार आहे. सभासदांची ताकद पाठीशी असल्यावर ही लढाई माझ्यासाठी अवघड नाही.

विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेला आशीर्वाद माझ्यासाठी उर्जा बनून कामाला येईन. आदिनाथ कारखान्यास उर्जीत अवस्थेत आणण्यासाठी या पॅनलच्या माध्यमातून तरुण व सामाजिक कामात निस्वार्थी पणे झोकुन देऊन काम करणारे युवक निवडणुकीत उतरवले आहेत. सुशिक्षित तरुणांची ही फळी साखर कारखान्या समोरील आवाहन तसेच भविष्यात यावरील उपाय योजना यासाठी अभ्यास करुनच निवडणुकीत उभे आहेत. आमच्या पॅनलकडे आदिनाथ कारखान्याच्या विकासाचा नियोजित आराखडा तयार आहे तर विरोधक केवळ स्वतःच्या राजकीय गटाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठीच निवडणुकीत उतरले आहेत. सभासदांचा विश्वास आणि भक्कम पाठींबा पाहता आमचा विजय निश्चित असल्याचा दावा आमदार नारायण आबा पाटील यांनी केला. प्रास्ताविक आमदार पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केले तर आभार महाराष्ट्र राज्य मल्लखांब असोसिएशन सचीव पांडूरंग वाघमारे यांनी मानले. ग्रामदैवत श्री नागनाथ महाराज मंदिरात पार पडलेल्या या सभेस सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेच्या सुरुवाती पुर्वी शेटफळ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास आमदार नारायण आबा पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page