आजी-माजी सैनिक संघटनेचे करमाळा तालुकाध्यक्ष अक्रुर शिंदे “सर्वोत्कृष्ट राष्ट्रसेवा’ पुरस्काराने सन्मानीत

करमाळा, दि. ३ (करमाळा-LIVE)-
टाईम्स ऑफ पुणे व महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् यांच्यावतीने यावर्षीचा ‘सर्वोत्कृष्ट राष्ट्रसेवा’ पुरस्कार सैनिक कल्याणकारी मंडळाचे करमाळा तालुकाध्यक्ष अक्रुर शिंदे यांना प्रदान करण्यात आला.
टाइम्स ऑफ पुणे आणि महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् आयोजीत “कारगिल विजय दिवस रौप्य महोत्सवी सोहळा” २ ऑगस्ट ला पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात कारगिल युध्दात सहभागी माजी सैनिक आणि वीर पत्नी यांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमात आजी-माजी सैनिक कल्याणकारी संघटनेचे करमाळा तालुकाध्यक्ष अक्रुर शिंदे यांना “टाइम्स ऑफ पुणे आणि महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् च्या “सर्वोत्कृष्ट राष्ट्रसेवा” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.एअरफोर्स विंग कमांडर एम तिरूमारन, मावळ येथील प्रांताधिकारी सुरेंद्र सोपान नवले, भोर चे तहसिलदार सचिन पाटील, बिटीया फाउंडेशनच्या अध्यक्षा संगिता तिवारी, सैनिक सेल चे प्रदेशाध्यक्ष दिपक शिर्के, पोलिस निरीक्षक संदीप नारायण देशमाने, पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, आदम अली सय्यद, सतिश राठोड, स्नेहा कुलकर्णी, अनिल पारे यांचे उपस्थितीत हा समारंभ संपन्न झाला.



