भैरवनाथ देवस्थानची शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम; भाळवणीत आज चैत्र पौर्णिमेला “बैल गाड्या ओढण्याची यात्रा


जेऊर, दि.6 (करमाळा-LIVE)-
जर वर्षी चैत्र पौर्णिमा म्हणजेच हनुमान जयंतीला करमाळा तालुक्यातील भाळवणी येथे भैरवनाथ देवस्थानची “बैल गाड्या ओढण्याची” यात्रा भरत असून गेल्या शेकडो वर्षांपासून ही परंपरा आजही सुरू असून आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही यात्रा पार पडणार आहे.
कोरोनामुळे सण 2020 आणि सण 2021 ला यात्रेला खंड पडला होता परंतु गेल्या वर्षी पासून पुन्हा एकदा यात्रा सुरू झाली असून आज भाळवणी येथे ही यात्रा मोठ्या उत्साह आणि भक्ती भावाने पार पडणार आहे.
गेल्या शेकडो वर्षांपासून सुरू असलेली ही यात्रा चैत्र पौर्णिमेच्या नऊ दिवस अगोदर सुरूवात होते, नऊ दिवस भाळवणी गावात घट बसविले जाते, नऊ दिवस उपवास केले जाते, गावातील शेतकरी अर्थात गुरव भाग्यवंत नवनाथ शिंदे आणि योगेश काकासाहेब टकले दोघेही नऊ दिवस घरातील एका बंद खोलीत कोणाच्याही संपर्कात न येता राहतात, त्यानंतर पौर्णिमेला बरोबर दुपारी 12 वाजता बारा बैल गाड्या एकमेकांना जोडलेल्या असतात त्या गाड्या गावातील गुरव भाग्यवंत शिंदे हे आपल्या शेंडीने ओढतात, आणि यात्रेला सुरूवात होते, बारा बैल गाड्यांमध्ये गावातील भैरवनाथ भक्त बसलेले असतात.
भैरवनाथ देवस्थानची ही परंपरा गेल्या शेकडो वर्षांपासून सुरू असून हा भैरवनाथाचा च चमत्कार असल्याचे गावातील वृध्द तसेच गावकरी सांगतात.


