October 12, 2026

चिखलठाण येथील ग्रामदैवत श्री कोटलिंग नाथाची आज अंबिल पौर्णिमा – 13 एप्रिलला मुख्य यात्रा

0
afd1f0dde05c4a30ab3724ba2c477fee.jpg

जेऊर, दि. 6 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथील ग्रामदैवत श्री कोटलिंग नाथाची यात्रेपूर्वीचा धार्मिक विधी सुरू असून आज 6 एप्रिलला अंबिल पौर्णिमा आहे.

श्री कोटलिंग देवाची धार्मिक विधी पुढीलप्रमाणे-
1) शनिवार 4 मार्च– देव पारध (देव शिकारीला जाण्याचा कार्यक्रम)
2) रविवार 5 मार्च– ससा-मासा
3) मंगळवार 28 मार्च- सायंकाळी 8 वाजता तेल लावणे, उपवास सुरू
4) बुधवार 5 एप्रिल- सायंकाळी 5 वाजत धज बांधणे
5) गुरूवार 6 एप्रिल- अंबिल पौर्णिमा
6) गुरूवार 13 एप्रिल- सकाळी दंडवत, महाप्रसाद, रात्री 12 वाजता छबिना
7) शुक्रवार 14 एप्रिल– बाजार
8) शनिवार 15 एप्रिल– शिळा बाजार व तेल उतरणे

वरीलप्रमाणे यात्रा होणार आहे. दरम्यान सोलापूर जिल्हा बरोबरच पुणे, उस्मानाबाद, सातारा जिल्ह्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चिखलठाण येथील कोटलिंग देवाची यात्रेला शेटफळ येथील मानाच्या कावडीने धार घालून होईल. यात्रेनिमित्त मंदिर परिसरात नयनरम्य विद्युत रोषणाई करण्यात येणार असून 13 एप्रिलला रात्री 12 वाजता छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page