शेलगावं (क) व निंभोरे येथे विविध विकास कामांचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते भूमिपुजन

करमाळा, दि. ५ (करमाळा-LIVE)–
आमदार संजयमामा शिंदे यांचा विकास कामांचा धडाका सुरू असून आज करमाळा तालुक्यातील शेलगावं (क) आणि निंभोरे येथे विविध विकास कामांचे भूमिपुजन करण्यात आले.
गेल्या पाच वर्षात प्रामुख्याने
- पांडे- शेलगावं – घोटी- केम रस्ता प्रजिमा 10 ( पांडे – शेलगाव क – साडे) सुधारणा करणे – 2 कोटी,
- जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा करणे – 80 लाख,
- नाना दुकानदार ते काटूळे आबा वाडा रस्ता सिमेंट कॉंक्रिटीकरण करणे- 5 लक्ष,
- उद्धव शिंदे वस्ती ते विकास वीर वस्ती रस्ता मुरमीकरण करणे- 3 लक्ष,
- खरपा वस्ती, माळी वस्ती नं 1 व मारुती मंदिर येथे प्रत्येकी 1 याप्रमाणे 3 हायमास दिवे बसविणे- 4.50 लक्ष,
- शेलगावं क -गुळसडी ग्रामीण मार्ग सुधारणा करणे – 20 लक्ष,
- जि.प प्रा शाळा शेलगावं क -1 नवीन वर्गखोली बांधणे – 9 लक्ष,
- 25 /15 योजनेअंतर्गत वीर वस्ती नं.1 ओड्यावर पूल बांधणे व खडीकरण करणे -10 लक्ष,
- आमदार स्थानिक विकास निधी मधून माळी वस्ती नंबर 2 येथे तालीम बांधणे – 7 लक्ष,
- जिल्हा नियोजन मंडळ मधून स्मशानभूमी शेड व वॉल कंपाऊंड बांधणे- 3.50 लक्ष,
- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्याकडून जिम ( व्यायाम साहित्य) 5 लक्ष,
- समाज कल्याण विभाग अंतर्गत बनसोडे समाज मंदिर समोर बौद्ध विहार बांधणे -10 लक्ष रुपये अशा एकूण तीन कोटी सत्तावीस लाख रुपये खर्चाच्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला.
तर मिरगव्हाण – अर्जुननगर – शेलगावंं क – सौंदे – वरकटणे – कोंढेज रस्ता प्रजिमा 8 सुधारणा करणे- 2 कोटी 90 लाख,
आमदार स्थानिक विकास निधी मधून वीर वस्ती नंबर 2 – बोगदा वस्ती येथे सभामंडप बांधणे -7 लाख,
आमदार स्थानिक विकास निधी मधून नागनाथ मंदिर येथे सभामंडप बांधणे – 10 लक्ष,
25/ 15 योजनेअंतर्गत गुळसडी ते शेलगाव क शिव रस्ता करणे- 4 लक्ष,
जिल्हा नियोजन मंडळ 30 54 अंतर्गत गुळसडी रोड ते माळी वस्ती नं 1 रस्ता खडीकरण करणे- 5 लक्ष,
जन सुविधा योजनेअंतर्गत स्मशानभूमी वॉल कंपाउंड बांधणे – 3 लक्ष,
जि प प्राथमीक शाळा शेलगावं क संरक्षक भिंत बांधणे – 3 लक्ष,
सिद्धार्थ नगर येथे सिमेंट काँक्रेट गटार बांधणे – 5 लक्ष
अशा एकूण तीन कोटी 57 लाख रुपये खर्चाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला.
यावेळी रामचंद्र कातुळे, पांडुरंग वीर, भरत वीर, उत्तरेश्वर वीर ,सचिन पाटील, सचिन वीर, आजिनाथ वीर, सुनील वीर, गणेश माने, किरण वीर, तात्या सांगडे, विलास वीर, अण्णा शिंदे, निलेश ननवरे, अंकुश शिंदे, विलास कातुरे, आप्पा वीर, केशव दास, राहुल कुकडे, प्रवीण जगताप, अमोल बनसोडे, प्रवीण बनसोडे, लखन डावरे, भास्कर वीर, सुनील माने, विक्रांत वीर, अभिमान वीर, नानासाहेब वीर, प्रशांत वीर, महादेव वीर, बापू चोपडे, धनंजय पायगन, अशोक माने, दिनकर पायगन, नागेश पायगन, पितांबर कुकडे आदी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल कुकडे, केशव दास, गणेश माने, सुनील माने यांनी विशेष परिश्रम घेतले .यावेळी माजी सरपंच अशोक काटुळे, सरपंच अंकुश जाधव, ग्रामपंचायत सदस्य धर्मराज शिंदे, रोपळे गावचे उपसरपंच दळवे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ. विकास वीर यांनी केले तर आभार धर्मराज शिंदे यांनी मानले.
निंभोरे येथे विविध विकासकामांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न-
निंभोरे येथे आमदार संजयमामा शिंदे यांच्या शुभहस्ते विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा व उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला.
1)निंभोरे ते कोंढेज रस्ता (हॅम 271 कोटी)
2) निंभोरे ते घोटी रस्ता – 1 कोटी
3) स्मशानभूमी सुशोभीकरण – 3 लाख रु.
4) तलाठी कार्यलय – 15 लाख रु.
5) पाणंद रस्ता – 5.5 लाख रु.
6) यल्लमा देवी मंदिर समोर पेव्हिंग ब्लॉक व वॉल कंपाउंड – 5.50 लाख रु. 7) गवळी, जगताप, वाघमारे, वरकड, सावंत, मारकड, काशीद, सांगडे, वळेकर, शिंदे वस्ती कडे जाणार कॅनॉल
8) बंदिस्त गटार 6 लाख रु.
9) स्वच्छ भारत मिशन – 12 लाख रु.
10) वॉटर फिल्टर – 6 लाख रु.
11) आंबेडकर नगर पाणीपुरवठा करणे – 5 लाख रु.
12) आंबेडकर नगर पेव्हिंग ब्लॉक -5 लाख रु.
13) अण्णाभाऊ साठे नगर पाणीपुरवठा करणे । लाख रु.
14) जि. प. प्रा. शाळा निंभोरे दुरुस्ती साठी 3 लाख रु.
यावेळी चंद्रकांत सरडे, विलास दादा पाटील, राजेंद्र बारकुंड, सुजित तात्या बागल, गव्हाणे साहेब, रवी वळेकर सरपंच, अशोक बप्पा वळेकर, चेअरमन संतोष पाटील, उपसरपंच धनंजय वळेकर, ग्रामपंचायत सदस्य अण्णा सावंत, ग्रामपंचायत सदस्य समाधान वळेकर, ग्रामपंचायत सदस्य दीपक गवळी, ग्रामपंचायत सदस्य अरुण वळेकर, बप्पा साहेब शहाजी, शहाजी काळदाते, पप्पू म्हस्के, दिनेश वळेकर, दत्ता वळेकर, अक्षय वळेकर, नाथा शिंदे, सोमा गुरव, गणेश वळेकर, अण्णा वळेकर, बिभीषण फरतडे, अमोल वळेकर, सुभान फरतडे, ज्योतीराम वळेकर, हभप अमोल काळदाते महाराज, बापू मोरे, बाळू सांगळे, अर्जुन काळदाते, दशरथ वळेकर, बापू वळेकर, दादा पठाण, राज पठाण, श्रीराम काळे, जालिंदर गवळी, प्रकाश खाडे, फंतु गवळी, धनंजय सांगळे, विक्रम मस्के, दिनेश फरतडे, संदीप दळवे, अतुल सांगळे, विकास सांगळे, राहुल फरतडे, धनंजय वाघमारे, अभिजीत वळेकर, शहाजी कोंडलकर, स्वप्निल पाडुळे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य निंभोरे व आर.व्ही ग्रुपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्राची राजेंद्र गवळी, राणी साधू सावंत ,सागर नागनाथ वाघमारे व बालाजी आप्पा गवळी यांचा विविध पदांवर नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सरपंच रविंद्र वळेकर यांनी केले. आभार विठ्ठल वरकड यांनी मानले तर सूत्रसंचालन विलास दोलतोडे यांनी केले