दोन दिवसांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान केलेल्या चिखलठाण येथील 103 वर्षीय आजीचे निधन
चिखलठाण, दि. 7 (करमाळा-LIVE)-दोन दिवसांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान केलेल्या 103 वर्षीय आजीचे दुःखद निधन झाले आहे.
चिखलठाण येथील निलावती माणिक गव्हाणे (वय 103) यांचे काल सायंकाळी सहा वाजता निधन झाले. चिखलठाण येथील सर्वात जास्त वयस्कर व्यक्ती म्हणून त्यांची नोंद होती मुत्यूसमयी त्या १०३ वर्षाच्या होत्या. विशेष म्हणजे पाच नोव्हेंबर रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी आपल्या नातवासोबत जाऊन मतदान केले होते.
मतदानानंतर नातवाने त्यांच्याबरोबर सेल्फी काढून सोशल मीडियावर पोस्ट केली होती ती सर्वत्र वायरल झाली होती. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे, पंतवडे असा परिवार आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांच्या नातवंडाने संपूर्ण ग्रामस्थ व नातेवाईकांना बोलावून शंभरावा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला होता.
यामध्ये चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीज मधील बाळासाहेब उर्फ भारत शिंदे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.