चिखलठाण येथील श्री कोटलिंग नाथाचा पालखी सोहळा उत्साहात साजरा

जेऊर, दि. २० (करमाळा-LIVE)-
चिखलठाण येथील श्री कोटलिंग नाथाचा श्रावणी पालखी मिरवणूक सोहळा उत्साहात संपन्न झाला.
या पालखी सोहळ्यास चिखलठाण व पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. सोलापूर, सातारा, नगर, पुणे जिल्ह्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या कोटलिंग देवस्थानाचा दरवर्षी श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी पालखी सोहळा आयोजित करण्यात येतो.
गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मंदिरापासून ते गावापर्यंत या पालखी सोहळ्याची वाजत गाजत मिरवणूक काढणेत येते. ग्रामस्थ गुलालाची उधळण करून पालखीचे स्वागत करतात. यावेळी भाविकांनी ढोल ताशांच्या गजरात लेझीम खेळून पालखीचे स्वागत केले. यावेळी ग्रामस्थांनी आपआपले दरासमोर रांगोळी काढून पालखीची पूजा केली. यावेळी भाविकांनी कोटलिंग देवाचे चांगभले या जय घोषणेने परिसर भक्तिमय झाला होता.
सौजन्य : श्री प्रदिप सरडे, चिखलठाण