October 9, 2026

येत्या गुरूवारी जेऊरात ‘भव्य मॕरेथाॕन स्पर्धेचे आयोजन

0
IMG_20240818_113822.jpg

जेऊर, दि. १८ (करमाळा-LIVE)-
येत्या गुरूवारी २२ आॕगस्टला जेऊर येथे ‘भव्य मॕरेथाॕन स्पर्धेचे आयोजन पृथ्वीराज भैय्या पाटील मित्रमंडळाने केले आहे.

माजी आमदार आणि आगामी करमाळा विधानसभेचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नारायण आबा पाटील यांच्या २३ आॕगस्टला असलेल्या वाढदिवसानिमित्त मॕरेथाॕन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

सदरील मॕरेथाॕन पुरुष खुला गटात १० किमी अंतर साठी होणार असून २२ आॕगस्टला सकाळी ८ वाजता जेऊर बाजारतळ येथून सुरूवात होणार आहे. ही स्पर्धा करमाळा-माढा मतदारसंघातील नागरिकांसाठी असणार आहे.

मॕरेथाॕन स्पर्धेचे बक्षीसे पुढीलप्रमाणे-

  1. प्रथम बक्षीस- १५,५५५
  2. द्वितीय बक्षीस- ११,१११
  3. तृतीय बक्षीस- ७,७७७
  4. उत्तेजनार्थ- १००० (२५ बक्षीसे)

मॕरेथाॕन चा मार्ग पुढीलप्रमाणे-

सुरुवात मार्ग-
बाजारतळ👉🏻 गणपती मंदीर👉🏻 सोनार पेठ👉🏻 मेनरोड👉🏻 बस स्टँड👉🏻 कुंभेज फाटा

परतीचा मार्ग-
कुंभेज फाटा👉🏻 बस स्टँड👉🏻 मेनरोड👉🏻 सोनार पेठ👉🏻 गणपती मंदीर👉🏻 बाजारतळ

सदरील स्पर्धकांना आयोजकांकडून टी-शर्ट देण्यात येणार असून यासाठी कुठल्याही प्रकारची प्रवेश फी घेण्यात येणार नाही तर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करावी लागणार आहे.

नाव नोंदणी साठी संपर्क-

  1. बाळासाहेब सरक- 8182952525
  2. विनोद गरड- 9421033203
  3. पांडुरंग वाघमारे- 9423526459
  4. दत्तात्रय वाघमोडे- 9423983350
  5. अंगद पठाडे- 9552997875

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page