07/06/2025

माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ करून जीवे मारण्याची धमकी ; सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

0
IMG-20221210-WA0012-2-2-1-1-1-1.jpg

जेऊर, दि. २७ (करमाळा-LIVE)-माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रध्दा रविराज पवार ही विवाहिता जेऊर येथील असून तीचे आई-वडील, पाहुण्यांच्या मध्यस्थीने तुळजापूर, ता.तुळजापूर येथील श्रीराम रंगनाथ पवार यांचा द्वितीय मुलगा रविराज श्रीराम पवार यांचे सोबत दि. 29/11/2023 रोजी जोतिर्लिंग मंगल कार्यालय कुंभेज फाटा, ता.करमाळा येथे हिंदू रितिरिवाजाप्रमाणे लग्न लावून दिले. सदरचा लग्नाचा खर्च माझे आई- वडीलांनी केला. तसेच लग्नात सर्वांना मानपान करुन 250000/- रु.चे संसारपयोगी भांडी व इतर साहित्य़ दिले. त्यानंतर सदर विवाहिता सासरी नांदावयास गेली. सुरुवातीचे काही दिवस व्यव़स्थित नांदविल्यानंतर तिचे पती रविराज श्रीराम पवार (मो.9067121281), सासरे श्रीराम रंगनाथ पवार (मो.9423073078), सासू अनुराधा श्रीराम पवार (मो.9422935354), थोरले दीर मयुर श्रीराम पवार, धाकटे दीर रोहित श्रीराम पवार व थोरली जाऊ भाग्यश्री उर्फ वृषाली मयुर पवार या सर्वांनी मला तुझे आई वडीलांनी आमचा व आमच्या पाहुण्यांचा मानपान केला नाही तसेच आम्हाला आमचे रविराजसाठी दुसरे चांगले स्थ़ळ आले होते ते आम्हाला भरपूर हुंडा देत होते पण तू तुझ्या आई वडीलांना तू एकुलती एक आहे तुझ्या आई वडीलांकडून भरपूर हुंडा मिळेल यामुळे आम्ही तुला पसंत केले. थोरले दीर मयुर श्रीराम पवार व धाकटे दीर रोहित श्रीराम पवार हे दोघे सतत माझ्याकडे वाकडया नजरेने बघत असत. लग्नात दिलेले सामान हलक्या प्रतीचे आहे असे म्हणून सासरे व सासू सतत घालून पाडून बोलत असे. माझी चुलत सासू शांता नवनाथ पवार ही पण आमच्या घरी येवून तुझ्या आई वडिलांनी लग्नात हुंडा व सोने दिले नाही तू तुझ्या आई वडिलांकडून पैसे व सोने घेवून ये असे सतत बोलून माझ छळ करीत असे.

सदरचे बोलणे तिने पतीला सांगितले असता पतीनेही माझे आई वडिल बरोबर बोलतात म्हणून पतीने विवाहितेला मारहाण केली. मी तुझ्याबरोबर लग्ऩ करुन मोठी चूक केली असे म्ह़णत असत. त्यानंतर सर्वांनी मला तुझे डी.फार्मसी झाले असून मेडीकल स्टोअर टाकण्यासाठी तू तुझ्या आई वडिलांकडून 200000/- रु. घेऊन अशी मागणी करीत होते. मी सर्वांनी विनंती केली की, माझ्या आई वडिलांचा लग्नात फार खर्च झाला असून त्यांची पैसे देण्याची परिस्थिती नाही असे म्हणल्यानंतर पती व सासरे यांनी विवाहितेला मारहाण केली.

वरील सर्व प्रकार मी माझे पती रविराज पवार व सासू अनुराधा पवार यांना सांगितला असता त्यांनी सासरे श्रीराम पवार यांना जाब न विचारता त्या दोघांनी मला मारहाण केली. त्या दोघांनी मला तू आई वडिलांना सांगितले तर तुला जीवंत ठेवणार नाही तसेच तुझ्या आई वडिलांनाही मारुन टाकू अशी धमकी दिली. तसेच तुला तुझ्या आई वडिलांना फोन करावयाचा असल्यास तू माझ्यासमोरच फोन करावयाचा असे पतीने सांगितले. माझे आई वडिल मला भेटायला आले तर मला आई वडिलांना एकटीला बोलू देत नसत. तू जर कोणाला काही सांगितले तर आम्ही तुला सोडचिठठी देऊ अशी मला सर्वजण धमकी देत होते. मला दिवस गेल्यानंतरही सास-याची माझ्यावर वाईट नजर होती. मला दिवस राहिल्याचा कोणालाही आनंद झाला नाही. दिवस गेलेले असताना मला उपाशी ठेवणे, सतत घालून पाडून बोलणे, मला वेळच्या वेळी औषधोपचारासाठी दवाखान्यात न घेऊन जाणे असे प्रकार सुरु होते. दवाखान्यातील गोळयाही मला घेवू देत नसत. मला सातवा महिना लागल्यानंतर 15 ऑगस्ट़ रोजी बाळंतपणासाठी घेऊन जाणेसाठी माझे आई वडिल आले. मी माझे माहेराला येण्यासाठी निघाले त्यावेळीही माझे पतीने तू कोणाला काही सांगितले तर मी तुझा व होणा-या बाळाचा स्वीकार करणार नाही.मी माझे माहेराला आल्यानंतरही खूप मानसिक तणावाखाली होते.

त्या तणावामुळे मला सोमवार दि.02/09/2024 रोजी मला झटके आलेनंतर माझे आई वडिलांनी मला करमाळा येथील कृष्णा हॉस्पीटल येथे ॲडमिट केले. माझे दि.07/09/2024 रोजी सीझर होवून मला मुलगा झाला होता परंतु सासरच्या लोकांच्या मानसिक त्रासामुळे माझ्या बाळाची वाढ न झालेमुळे त्याचा मृत्यू झाला त्यालाही सासरचे लोक जबाबदार असून त्यांचेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा. त्यानंतर मी चार दिवस बेशुध्द़ होते. शुध्दीवर आलेनंतर डॉक्टरांनी मला बी.पी.च्या गोळया का खाल्ल्या नाहीत असे विचारले असता मला सासू गोळया खाऊ देत नव्हती असे सांगितलेनंतर मी रडायला लागले त्यानंतर माझे आईने मला विचारले असता मी वरील सर्व प्रकार आई वडिलांना सांगितला.

या प्रकरणी करमाळा पोलीस स्टेशनला रविराज श्रीराम पवार, अनुराधा श्रीराम पवार, श्रीराम रंगनाथ पवार, मयुर श्रीराम पवार, भाग्यश्री मयुर पवार, रोहित श्रीराम पवार यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page