06/06/2025

विश्वास जुना, जगताप गट पुन्हा! जगताप गटाचा आजपासून गावभेट दौरा ; शंभूराजे जगताप विधानसभा लढविणार?

0
IMG_20241015_083500.jpg

करमाळा, दि. १५ (करमाळा-LIVE)-
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवानेते शंभूराजे जगताप यांचा आजपासून तालुका गावभेट दौऱ्याला सुरूवात होणार आहे.

जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे जगताप यांनी आजपासून करमाळा तालुक्यातील सर्व गावांना भेटी देवून नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व विधानसभा निवडणूकीच्या पाश्वभूमीवर कार्यकर्त्यांशी सवांद साधण्यासाठी ‘तालुका गावभेट दौऱ्याचे’ नियोजन केले आहे.

अद्याप जगताप गटाची विधानसभेबाबतची भूमिका गुलदस्त्यात आहे. त्यामुळे तालुक्यातील जगताप जनतेच्या मनात जगताप गटाच्या भूमिकेबाबत उत्सुकता आहे.

आजपासून ‘विकासाचे वचन करमाळकरांना, विश्वास जुना जगताप गट पुन्हा’ हे ब्रिद वाक्य हाती घेवून हा जनसंपर्क दौरा सुरु होत असून दररोज गावांना शंभूराजे भेट देवून तेथील नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

निवडणूक आयोगाकडून लवकरच आचारसंहिता जाहीर होणार असल्याने शंभूराजे यांच्या गावभेट दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. माजी आमदार जयवंतराव जगताप यांना मानणारा कट्टर कार्यकर्त्यांचा वर्ग आहे, जगताप गट हा निष्ठावंताचां गट मानला जातो. शंभूराजे यांनी यापूर्वी समाजकारण अन् राजकारणात प्रवेश केल्या पासून अनेक विधायक उपक्रम राबविले आहेत. गट -तट न मानता अनेकांना मदतीला धावून गेले आहेत. त्यामुळे गावागावातून त्यांना मानणाऱ्या युवकांची फळी तयार झाली आहे.

ऐन निवडणूकीच्या तोंडावर त्यांनी गावभेट दौरा सुरु केल्याने तालुक्यातील सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

आजचा गावभेट दौरा-
पोपळज, उमरड, सोगावः पूर्व, रिटेवाडी, मांजरगाव

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page