17/04/2026

जेऊरच्या स्वामी विवेकानंद पतसंस्थेच्या मृत सभासदाच्या कुटुंबीयांना विम्याचा धनादेश प्रदान

0
IMG-20241011-WA0022.jpg

जेऊर, दि. १३ (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे सभासद सुभाष भगवान कांडेकर यांचे रेल्वे अपघातात निधन झाले होते. त्यांचे वारसांना पन्नास हजारांचा धनादेश देण्यात आला.

स्वामी विवेकानंद पतसंस्था प्रत्येक सभासदांचा दी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी कडे पन्नास हजारांचा अपघाती विमा उतरवते, पतसंस्थेचे मयत सभासद सुभाष कांडेकर यांचे वारस लक्ष्मी सुभाष कांडेकर यांना अपघाती विम्याचा पन्नास हजारांचा चेक संस्थेचे चेअरमन नागेश झांजुर्णे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी संस्थेचे सचिव प्रशांत पाथरूडकर, बाळासो सूर्यवंशी विमा एजंट बाळासो कर्चे तसेच संस्थेचे कर्मचारी व सभासद उपस्थित होते.

सदर योजना संस्थेच्या सभासदांच्या वारसास व कुटुंबास आर्थिक हातभार लागावा या हेतूने चालू केली असून सदर योजनेचा लाभ होतो आहे असे संस्थेचे चेअरमन नागेश झांजुर्णे यांनी सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page