२३ वर्षांंनंतरही मैत्री आजही कायम ; जेऊरच्या भारत हायस्कूलच्या २००२ सालच्या बॕच ने केले अनोखे गेट-टू-गेदर


जेऊर, दि. ५ (गौरव मोरे)-
जेऊर येथील भारत हायस्कूलमध्ये रविवारी १ जूनला तेवीस वर्षांपूर्वीच्या दहावीतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन जुन्या आठवणी जागवल्या.
नोकरी व्यवसाय निमित्त विविध ठिकाणी असणाऱ्या भारत हायस्कूल जेऊर येथे २००१-२००२ साली दहावी मध्ये असणाऱ्या वर्गमित्रांनी एकत्र येऊन स्नेहमेळावा घेण्याचे ठरवले या बॅचमधील बरेचसे विविध ठिकाणी नोकरी, व्यावसायिक, अधिकारी तर कुणी वेगवेगळ्या खात्यामध्ये कर्मचारी तर काही जणांनी शेती सांभाळून आपल्या कुटुंबाची प्रगती करत आहे.
जेऊरच्या भारत हायस्कूलच्या २००२ साल च्या बॕचने व्हट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्रितपणे येऊन सर्वांनी एकमेकांनाशी संपर्क केला आणि सर्वांनी एकत्र येण्याची कल्पना मांडली सर्वांनाच ती आवडली तात्काळ सर्वांनी होकार दिला दिवस ठरला वेळ ठरली. ती म्हणजे १ जून २०२५ ची.
यावेळी वर्ग मित्र-मैत्रिणी एकत्र आले. शालेय जीवनात असताना घडलेल्या वेगवेगळ्या घटनांची आठवण निघाली. सुख, दुःख, भावनिक, काॕमेडी अशा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाल्या, त्याच बरोबर वर्षातून किमान दोन वेळा भेटण्याचे ही यावेळी ठरविण्यात आले.
तेवीस वर्षानंतर आला आठवणींना उजाळा.
तेवीस वर्षानंतर प्रथमच सर्व विद्यार्थ्यांनी नियोजन करून आपापल्या व्यापातून सवड काढून साजरा केला मित्र स्नेह मेळावा. कुंभेज फाटा येथील सुप्रिम हॉटेल च्या हॉल मध्ये स्नेह मेळावा साजरा करण्यात आला. यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स घेण्यात आल्या, माजी विद्यार्थी यांच्याबरोबर शिक्षकांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
अनेक ठिकाणहून आलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगत ही व्यक्त केली. तेवीस वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा देण्यात आला प्रत्येकाने शाळेविषयी आपलेपणा व कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी विशेष अशा स्नेहभोजनाचे आयोजन हॉटेल सुप्रिम येथे करण्यात आले होते.


















- भारत प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील व भेटकार्ड
- सोलापूर सामाजिक वनीकरण विभागाकडुन आयोजित स्पर्धेत जेऊरच्या भारत हायस्कूलची आरूषी बादल प्रथम तर शिवानी कुंभार तृतीय
- स्वतःचा कारखाना विकणाऱ्या माजी आमदार शिंदे आणि त्यांच्या गटाने आदिनाथची काळजी करू नये- पाटील गट
- जेऊर येथील ओंकार पोळ याचे प्रथम पुण्यस्मरण ; केम व शेटफळ येथे विद्यार्थ्यांना भोजन व शालेय साहित्यांचे वाटप
- कोर्टीच्या सरपंच भाग्यश्री नाळे-मेहेर यांना ग्रामररत्न सरपंच पुरस्कार जाहीर


