जेऊर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी


जेऊर, दि. 21 (करमाळा-LIVE)-
जेऊर येथे संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड व शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मुर्तीस व सर्व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी वीर माता सोनाबाई काटे व आजी माजी सैनिक यांच्या हस्ते स्मृतीस पुजन करुन पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष अंकुर शिंदे, रवींद्र सव्वाशे, उपाध्यक्ष भास्कर आरकिले, शिवाजी खबाले, नितीन पवार, सोमनाथ शिरसकर, सुभाष मुटके, कल्याण कदम, आनंद पवार, कल्याणराव साळुंखे, भीमराव माने उपस्थित होते.
यावेळी महिलांनी जिजाऊ वंदना म्हणून कार्यक्रमाची सुरुवात केली त्यानंतर महिलांनी व लहान मुलामुलींनी पोवाडे व पाळणे म्हटले. छत्रपती शिवाजी महाराजांवरती भाषणे केली. शांताबाई ननवरे या 80 वर्षांच्या आजीने भारदस्त आवाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर गीत गायले व हर्षदा देशमाने यांनी भारदस्त आवाजामध्ये सादर केली. श्रद्धा जगताप यांनी उत्कृष्ट आवाजात छत्रपती शिवरायांना डोक्यावर घेऊन जरूर नाचा पण एकदाच ढाल- तलवारी जाती धर्मा पलीकडचे शिवराय नक्की वाचा तसेच शिवरायांच्या वेशभूषेमध्ये दिपराज नाईकनवरे यांनी सर्वांचे लक्ष वेदले. प्रथमेश झिंजाडे यांनी सर्व महापुरुषांवरती विचार मांडले व आरोही तुपसमींदर, सई खटके, पूर्वा मोहिते, तेजस्विनी पाटील, नम्रता पाटील, प्रेरणा शिंदे, स्वरा निर्मळ, ऋषिकेश शिंदे, स्वरा आवटे यांनी छत्रपती शिवरायांवरती आपले विचार व्यक्त केले. यावेळेस महिलांचे उपस्थिती लक्षणीय होती पुरुषांच्या विचारांची पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला व सूत्रसंचालन बाळासाहेब तोरमल यांनी केले. कार्यक्रम नियोजन पुणे विभागीय कार्याध्यक्ष नितीन खटके व सर्व संभाजी ब्रिगेड कार्यकर्ते, शिवजंयती समीतीचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

