October 12, 2026

आता माघार नाहीच! जेऊरकरांचा आज यल्गार- हुतात्मा एक्सप्रेसचा थांबा मिळावा यासाठी हजारोंच्या संख्येने रेल्वे प्रशासनाला देण्यात येणार निवेदन

0
IMG_20230220_182232.jpg

जेऊर, दि. 21 (करमाळा-LIVE)-
आज मंगळवारी 21 तारखेला जेऊर येथील स्टेशन मास्तर यांना हुतात्मा एक्सप्रेसचा थांबा मिळविण्यासाठी हजारोंच्या संख्येने निवदेन देण्यात येणार असून हुतात्मा एक्सप्रेसला थांबा मिळाला नाही तर रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान जेऊर परिसरातील नागरिकांचा याला पाठिंबा मिळत असून निवेदन देताना शांततेने उपस्थितीत राहण्याचे आवाहन प्रवासी संघटनेकडून करण्यात आले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या हुतात्मा एक्सप्रेस थांब्यासाठी रेल्वे प्रशासन उदासीन आहे. रेल्वे प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नाही. जेऊरकरांचा अंत पाहत असून आता माघार नाही असा निर्धार काल जेऊर येथे बैठकीत करण्यात आला होता.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page