जेऊर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा आणि शिवसृष्टी साठी 75 लाखांचा निधी द्यावा- माजी आमदार नारायण आबा पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


जेऊर, दि. 19 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आणि शिवसृष्टी साठी ७५ लाख रुपयांचा निधी मिळावा अशी मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे चालू असून माजी आमदार नारायण पाटील यांनी नागपूर येथे जाऊन प्रत्यक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
यावेळी करमाळा मतदार संघातील रखडलेल्या विकासकामांना निधी मिळावा अशी मागणी त्यांनी केली. या कामाबद्दल चर्चा केली तसेच जेऊर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्याचा जेऊर ग्रामपंचायतीचा संकल्प असून यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या तसेच समती साठी राज्य सरकारचे सहकार्य आणि पुतळा व शिवसृष्टी साठी ७५ लाख रुपयांचा निधी मिळावा अशी आग्रही मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी मुख्मंत्र्यांकडे केली आहे.

याबत चर्चा करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला तसेच सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यामागणीचे एक लेखी निवेदन माजी आमदार नारायण पाटील यांनी मुख्यमंत्री महोदय यांचे कडे सादर केले. जेऊर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ व पूर्णाकृती पुतळा उभा करण्याचा माजी आमदार नारायण पाटील यांचा मानस अनेक वर्षा पासून आहे. यासाठी जेऊर ग्रामपंचायत यांचे कडून जागा निश्चित करण्यात आली आहे. तसेच माजी आमदार नारायण पाटील यांनी स्वतः काही नामांकित व पारंगत अशा शिल्पकारांची भेट घेऊन याबाबत माहिती घेतली. परंतु विविध शासकीय परवानग्या आणि निधी याबाबत राज्य सरकारचे सहकार्य मिळावे म्हणून त्यांनी आता थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे साकडे घातले आहे. यामुळे लवकरच हा पुतळा उभा राहणार अशी आशा शिवप्रेमी आणि जेऊर परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.
- कुंभेजच्या बागल विद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी ; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप
- विद्यार्थ्यांच्या करीअरला मिळाली नवी दिशा ; करमाळ्यात यशवंत अकॅडमीचे भव्य उद्घाटन
- वैष्णवी, सुचिता अन् रोहित यांची पोलिस दलात निवड ; तिघांचा कुंभेज येथे सन्मान
- श्री.वटवृक्ष मंदिरात स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या धर्मसंकीर्तन व्यासपीठाचे पूजन
- जेऊर येथे महिला दिन उत्साहात साजरा ; ‘हिरकणी’ स्पर्धेत अपेक्षा अवसरे यांचा प्रथम क्रमांक


