07/06/2025

जेऊरच्या इरा पब्लिक स्कूल मध्ये बाल दिंडी सोहळा संपन्न

0
IMG-20240717-WA0043.jpg

जेऊर, दि. १८ (करमाळा-LIVE)-
जेऊरच्या इरा पब्लिक स्कूल मध्ये बाल दिंडी सोहळा संपन्न झाला.आषाढी एकादशी निमित्ताने बाल दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी बाल दिंडी जेऊर मधील बाजारपेठ ते विठ्ठल रखुमाई चे मंदीर अशी काढण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांनी हातात भगवे झेंडे व संदेश देणारे फलक घेतले होते. बेटी बचाव बेटी पढाव, पाणी आडवा पाणी जिरवा, जीवनातील शैक्षणिक महत्त्व यांसारखे संदेश देणारे ते फलक होते.यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपारिक फुगडी, हरिनामाच्या गजरात टाळ वादन, नृत्य सादर केले.यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रखुमाई, मुक्ताई, जनाबाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सावता माळी यांच्या वेशभुषा परिधान केल्या होत्या.

या बाल दिंडीत सम्यक अवसरे आणि रुही मुथा यांनी अनुक्रमे विठ्ठल व रखुमाई चा पोषाख परिधान केला होता.

पालखी सोहळा विठ्ठल मंदिरात आल्यावर विशाल किरवे व सारिका किरवे या दाम्पत्यांच्या हस्ते विठ्ठल-रखूमाई ची आरती करण्यात आली.

यावेळी इरा पब्लिक स्कूलचे अध्यक्ष डॉ. ब्रिजेश बारकुंड, सचिव सुनिल अवसरे तसेच पालक वर्ग उपस्थित होते.

हा सोहळा संपन्न करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष ब्रिजेश बारकुंड, सचिव सुनिल अवसरे, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व ड्रायव्हर बंधू आदींनी अथक परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page