जेऊर महावितरणचे कर्मचारी संपावर; जेऊर परिसरातील बत्ती गुल

करमाळा, दि. 4 (करमाळा-LIVE)-
महावितरणचे (MSEB) खासगीकरण होऊ नये म्हणून राज्यातील वीज कर्मचारी संपावर गेले असून जेऊर एमएसईब मधील कर्मचारी ही संपावर आहेत. आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास जेऊर परिसरातील बत्ती गुल झाली असून लाईट कधी येणार हे सांगणे कठीण आहे.
महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तीन दिवस हा संप सुरू राहणार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान जेऊर एमएसईब 33 KV अंतर्गत जेऊर, घोटी, साडे, केम उपकेंद्र सध्या बंद असून या उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या 12 गावातील वीज पुरवठा बंद झालेला आहे. जेऊर एमएसईब मधील कर्मचारी संपावर गेल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला असून तो वीज पुरावठा सुरू होण्यासाठी वेळ लागू शकतो, तसेच याचा अनेक ग्राहकांना त्रास होऊ शकतो.

