October 9, 2026

जलजीवन मिशन अंतर्गत ‘भिवरवाडी’ येथे नळ पाणीपुरवठा योजना मंजूर

0
IMG-20230103-WA0032.jpg

करमाळा, दि. 3 (करमाळा-LIVE)-
जलजीवन मिशन अंतर्गत करमाळा तालुक्यातील भिवरवाडी येथे नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली असून या योजनेसाठी 57 लाख 45 हजार 222 रुपये निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायतीचे उपसरपंच डॉ. भाऊसाहेब शेळके यांनी दिली.

भिवरवाडी गाव हे पूर्वी वांगी ग्रुप ग्रामपंचायत मध्ये होते, चार महिन्यांपूर्वी भिवरवाडी आणि वांगी नंबर चार अशी स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात आली. उजनी धरणाच्या पाण्याच्या काठावर असणार्या या गावात पाणीपुरवठा योजना नसल्याने लोकांना अडचण येत असे या गावांसाठी असून डॉ भाऊसाहेब शेळके यांनी मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल, बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल व भारत साळुंके यांच्या सहकार्याने व सततच्या पाठपुराव्यामुळे नळ पाणीपुरवठा मंजूर झाली आहे. ही योजना मंजूर झाल्यामुळे भिवरवाडीतील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे.पाणीपुरवठा मंजूर करून आणल्यामुळे गावकर्‍यां मधून आनंद व्यक्त केला जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page