07/06/2025

जेऊर एमएसईबच्या (MSEB) शितल जाधव-सरडे उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने सन्मानीत

0
IMG-20240312-WA0029.jpg

जेऊर, दि. १२ (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील महापारेषण विभागात कार्यरत असलेल्या तंत्रज्ञ शितल जाधव-सरडे यांना दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या वतीने उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.

मंगळवेढा येथील दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या करमाळा विभागीय कार्यालयाच्या वतीने द्वितीय वर्धापण दिनानिमित्त उत्कृष्ठ अभियंता म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

शितल जाधव-सरडे ह्या गेली चार वर्षांपासून जेऊर एमएसईब मध्ये तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या उच्च वाहिनी केद्रांत त्या एकट्याच महिला कर्मचारी आहेत. इतर सर्व पुरुष कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने आपले कर्तव्य ते प्रामाणिक पणे बजावत आहेत.

या कार्यक्रम प्रसंगी संपूर्ण सरडे परिवार व त्यांचे नातेवाईक, मोठ्या संख्येने करमाळा येथे कार्यक्रम ठिकाणी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page