जेऊर येथे आज कोणार्क एक्सप्रेसचे होणार जंगी स्वागत ; खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर राहणार उपस्थित
करमाळा, दि. 27 (करमाळा-LIVE)-
जेऊर रेल्वे स्टेशानवर कोणार्क एक्स्प्रेसला थांबा मिळाला असून गाडी काल शनिवार पासून सुरू झालेली आहे. दरम्यान या गाडीला थांबा मिळण्यासाठी विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पुढाऱ्यांच्या बहुप्रतिक्षित मागणीला यश आले असून जेऊर येथे आज रविवारी दि. 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्सप्रेस (गाडी क्र. 11020) च्या जेऊर येथील थांब्याचे उद्घाटन खासदार निंबाळकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जेऊर येथील रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुहास सुर्यवंशी यांनी दिली आहे.
जेऊर येथे कोणार्क एक्स्प्रेसला थांबा मिळण्यासाठी जेऊर ग्रामस्थ, रेल्वे प्रवासी संघटना, जेऊर व्यापारी संघटना, पंचक्रोशीतील ग्रामपंचायती तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांनी वेळोवेळी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता. कोणार्क (गाडी क्र.11020) एक्सप्रेस रेल्वेचे जेऊर स्थानकावर रविवारी सायंकाळी 7 वाजता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि रेल्वे अधिकारी स्वागत करणार आहेत.
सदरच्या कार्यक्रमाला जेऊर तसेच परिसरातील प्रवाशांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रेल्वे प्रवासी संघटना आणि रेल्वे विभागाने केली आहे.
- रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरीच्या जाचक अटी शिथिल करा- भाजप जिल्हा सचिव लक्ष्मण केकान
- करमाळ्यात मराठा कुणबी प्रकरणासाठी अडवणूक ; ऐजंट आणि अधिकाऱ्यांमध्ये मिलीभगत- युवासेनेचा धरणे आंदोलनाचा इशारा
- भाळवणीच्या तृप्ती वाघमारे चे नीट (NEET) परीक्षेत घवघवीत यश
- कुंभेजच्या बागल विद्यालयात केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धांचे आयोजन
- २०१४ ला २५७ चा मटका नव्हता, जनतेचा कौल होता! हे २०२४ लाही जनतेने दाखवून दिले ; विरोधकांना पाटील गटाचा “हाबाडा”