जेऊर ग्रामपंचायतवर ‘पृथ्वी’ राज : जेऊरचा डाव पाटलांचाच ; विरोधकांचे पानिपत



जेऊर, दि. 6 (करमाळा-LIVE)-
सर्व तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या जेऊर ग्रामपंचायतवर पाटील गटाने विरोधकांना चारीमुंड्याचीत केले असून जेऊर ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधकांचा दारूण पराभव करून एकहाती सत्ता मिळविली आहे. पाटील गटाने पुन्हा एकदा सर्वच्या सर्व 15 जागा आणि सरपंचपदाची जागा जिंकून सत्ता काबीज केली आहे.
पाटील गटाचे सरपंचपदाचे उमेदवार पृथ्वीराज पाटील 1329 मतांनी विजयी झाले आहेत.
करमाळा तालुक्यातील 15 ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. करमाळा तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींचा समावेश असला तरी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या जेऊर ग्रामपंचायत वर सर्व तालुकावासियांचे लक्ष लागून राहिले होते. कारण शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांचे हे गाव असून गेल्या तीस वर्षांपासून जेऊर ग्रामपंचायतवर त्यांची सत्ता आहे.
15 सदस्य संख्या असलेल्या जेऊर ग्रामपंचायतची ही निवडणूक पाटील-शिंदे गटात दुरंगी लढत झाली. 15 जागांसाठी 15 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उभे होते. परंतु माजी आमदार नारायण पाटील यांनी तीस वर्षांची सत्ता कायम ठेवून 15 पैकी 15 सदस्य तसेच सरपंचपदाचे उमेदवार पृथ्वीराज पाटील विजयी झाले आहेत.
जेऊर ग्रामपंचायतच्या इतिहासात दुसऱ्यांदा जनतेतून सरपंचपदासाठी निवडणूक पार पडली, जेऊर ग्रामपंचायतचे सरपंचपद ओबीसी साठी राखीव होते यासाठी तिरंगी लढत झाली पाटील गटाकडून पृथ्वीराज पाटील, शिंदे गटाकडून नितीन खटके तर अपक्ष म्हणून बाळासाहेब कर्चे निवडणूकीच्या रिंगणात उभे होते. पाटील गटाच्या पृथ्वीराज पाटील यांनी 2372 मते घेऊन शिंदे गटाचे नितीन खटके यांचा 1329 मतांनी पराभव केला असून श्री खटके यांना मते 1043 मिळाली आहेत तर अपक्ष उमेदवार बाळासाहेब कर्चे यांना तीन आकडी मते ही पडले नाहीत त्यांना 99 मते मिळाली. तर नोटा ला 37 एवढी मते मिळाली.

पुढीलप्रमाणे निवडून आलेले उमेदवार आणि कंसात मते
प्रभाग क्रमांक-1
1) धनंजय मारुती शिरस्कर (428)
2) नागेश जोतीराम झांझुर्णे (498)
3) उषा राकेश गरड (476)

प्रभाग क्रमांक-2
1) सागर हनुमंत भगत (560)
2) शुभम रामदास कोठावळे (528)
3) शिवांजली योगेश कर्णवर (563)

प्रभाग क्रमांक-3
1) उमेश परसराम मोहिते (461)
2) शबाना इकबाल पठाण (435)
3) मालन सुभाष निमगिरे (485)

प्रभाग क्रमांक-4
1) ओंकार भास्कर कांडेकर (531)
2) अलका भारत किरवे (541)
3) प्रियांका उमेश निर्मळ (514)

प्रभाग क्रमांक- 5
1) संदीप धनराज कोठारी (483)
2) रोहिणी शांताराम सुतार (511)
3) समिरा सुयोग दोशी (424)

पराभूत उमेदवारांना पडलेली मते.
प्रभाग क्रमांक-1
1) अमर गादिया (271)
2) आदिनाथ माने (196)
3) प्रिती लोंढे (214)
प्रभाग क्रमांक-2
1) अतुल निर्मळ (269)
2) कांचन शिरस्कर (230)
3) निकील मोरे (230)
प्रभाग क्रमांक-3
1) प्रियंका गावडे (139)
2) शितल गादिया (130)
3) महेश जालिंदर कांडेकर (136)
प्रभाग क्रमांक-4
1) बालाजी गावडे (169)
2) पुनम कदम (176)
3) प्रिती लोंढे (189)
प्रभाग क्रमांक-5
1) अभयराज लुंकड (175)
2) धनश्री पाथ्रुडकर (252)
3) कांचन शिरस्कर (171)
नोटा ला पडलेली मते
प्रभाग-1 (31)
प्रभाग-2 (17)
प्रभाग-3 (12)
प्रभाग-4 (10)
प्रभाग-5 (9)
- पाटील गटाच्या विजयाची कारणे-
- जेऊर मधील मागील तीस वर्षांत केलेला विकास, मतदारांचा असलेला विश्वास, निवडून येणाऱ्या उमेदवारांना दिलेली उमेदवारी, तरूणांना संधी, गावातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहचून होम टू होम प्रचार. माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या प्रमाणे पृथ्वीराज पाटील यांच्यावरही जनतेने ठेवलेला विश्वास.
- शिंदे गटाच्या पराभवाची कारणे-
- सत्ताधाऱ्यांना पाच वर्षे विरोध करून ऐनवेळी अति आत्मविश्वास ठेवून गटात समन्वयाचा अभाव उभा करणे, जर निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीत ही पाच हजार मतदारांपैकी पंधरा उमेदवार निवडणूकीसाठी न मिळणे, एक उमेदवार वेगवेगळ्या प्रभागातून किंवा एका घरातील दोन व्यक्तींनी वेगवेगळ्या प्रभागातून निवडणूक लढविणे. प्रचारात बॕकफुटवर, मतदारांनी निवडून देण्यासाठी मतदारांना विश्वासात न घेता सत्ताधाऱ्यांची उणी-धुणी काढणे.

