जेऊर ग्रामपंचायत साठी 71% मतदान
जेऊर, दि. 5 (करमाळा-LIVE)-
सर्व तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या करमाळा तालुक्यातील जेऊर ग्रामपंचायत निवडणूकीसाठी 71% मतदान झाले आहे.
जेऊर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पारंपारिक पाटील गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये 15 सदस्य संख्या असलेल्या “जेऊर ग्रामपंचायतीसाठी दुरंगी लढत होत आहे. 5024 पैकी 3551 म्हणजेच 70.62 % मतदान झालेले आहे.
सरपंचपदासाठी तिरंगी लढत
जेऊर ग्रामपंचायतच्या इतिहासात आता दुसऱ्यांदा जनतेतून सरपंचपदासाठी निवडणूक झाली आहे. जेऊर ग्रामपंचायतचे सरपंचपद ओबीसी साठी राखीव असून यासाठी तिरंगी लढत होणार असून पाटील गटांकडून पृथ्वीराज पाटील, शिंदे गटांकडून नितीन खटके तर अपक्ष म्हणून बाळासाहेब कर्चे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
जेऊर ग्रामपंचायत निवडणूकीसाठी झालेले मतदान-
प्रभाग-1
1089 पैकी 721
प्रभाग- 2
1151 पैकी 816
प्रभाग- 3
825 पैकी 611
प्रभाग- 4
992 पैकी 718
प्रभाग-5
967 पैकी 685
एकूण-
5024 पैकी 3551
टक्केवारी- 71%