बावीस वर्षांंची परंपरा आजही कायम; जेऊर येथे ‘जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
जेऊर, दि. ९ (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर येथे ८ ते १४ मार्च पर्यंत जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जागतिक महिला दिनाचे हे २२ वे वर्ष असून या निमित्ताने ‘महिला महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे.
माजी आमदार नारायण आबा पाटील मित्र मंडळ व ग्रामपंचायत जेऊरच्या सहकार्यातून गेली एकवीस वर्षे अखंडितपणे महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी विविध प्रकारचे उपक्रम, स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्याच प्रमाणे यंदाच्याही महिला महोत्सवात जेऊर व परिसरातील महिलांसाठी भरगच्य कार्यक्रमांची पर्वणी असणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन ज्योतीताई नारायण पाटील यांच्या हस्ते झाले.
यावेळी जयश्री दळवी, मंगल गादिया, ताहिरा शेख,नंदा गादिया, कल्पना पाबळे, जनाबाई कांबळे, रत्नमाला बादल, भाग्यश्री वाघमोडे, अजिता पाटील, ग्रामपंचायत सदस्या समीरा दोशी, रोहिणी सुतार, यास्मीन
शेख, अनिता जगताप, उषा गरड, उज्वला कुलकर्णी, साधना लुणावत, अपर्णा पाथ्रुडकर, डॉ. शारदा सुराणा,
सुनिता पाटील, रेणुका दोशी, उषा सरक, अंकिता वेदपाठक, सुनिता वाघमारे, दिपा दोशी, गयाबाई बदे, शीतल पाटील, अलका व्यवहारे, रागिनी ठाकर, राणी सरडे, मंगल जगताप, मनीषा वनवे, मीनाक्षी सरक, भाग्यश्री वाघमोडे, भारती बलदोटा, अश्विनी देशपांडे, मनिषा लोंढे, संजीवनी महामुनी, सुवर्णा सानप, प्रफुल्लता देशपांडे, संगीता तळेकर, माया सपकाळ आदी उपस्थित होत्या.
रोहिणी सुतार व अपर्णा पाथ्रुडकर यांनी स्वागतगीत म्हटले तर आभार समीक्षा कुलकर्णी हिने आभार मानले.
पुढीलप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
१) ८ मार्च- महिला महोत्सवाचे उद्घाटन
२) ९ मार्च- रांगोळी, उखाणे, व फनी गेम्स स्पर्धा
३) १० मार्च- अंताक्षरी व फनी गेम्स,
४) १२ मार्च- वेशभूषा, अभिनय व फनी गेम्स,
५) १३ मार्च- वक्तृत्व, पाककला व फनी गेम्स
६) १४ मार्च- नृत्य व बक्षीस वितरण
प्रत्येक महिला ही कलागुणांनी संपन्न असतेच. त्यांना आपल्या कलागुणांच्या माध्यमातून व्यक्त होण्यासाठी फक्त एक सुसंस्कृत व हक्काचे व्यासपीठ हवे असते. आणि हा उद्देश ठेवून मा.आ.नारायण आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न गेली एकवीस वर्षे अखंडितपणे करत आहोत. आणि यापुढेही करत राहू.
ज्योतीताई नारायण पाटील