08/06/2025

जेऊरवाडीच्या शिवशंभो कुस्ती संकुलाच्या मल्लांचे जिल्हास्तरीय स्पर्धेत यश

0
IMG-20221216-WA0015.jpg

जेऊर, दि. 16 (करमाळा-LIVE)-
जेऊरवाडीच्या शिवशंभो कुस्ती संकुलाच्या मल्लांचे जिल्हास्तरीय स्पर्धेत यश मिळविले आहे.

दि. 10 डिसेंबरला माळशिरस तालुक्यातील खडुस येथे झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत जेऊरवाडी येथील शिवशंभो कुस्ती संकुल मधील मल्लांनी चार सुवर्ण व एक रोप्य पदक मिळवून घवघवीत यश प्राप्त केले आहे.

यशस्वी मल्ल पुढीलप्रमाणे-
1) उत्कर्ष भिसे- 48 किलो वजनी गटात 14 वर्षखालील सुवर्णपदक
2) सुजित हजारे– 55 किलो वजनी गटात 17 वर्षाखालील सुवर्णपदक

3) किरण मुटेकर– 71 किलो वजनी गटात 17 वर्षाखालील सुवर्णपदक
4) संकेत शिंदे– 82 किलो वजनी गटात 19 वर्षाखालील सुवर्णपदक
5) पृथ्वीराज घोगरे– 71 किलो वजनी गटात 17 वर्षाखालील रौप्य पदक मिळाले.

या मल्लांना महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगिरे व वस्ताद श्रावण कळेल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच तुळशीदास निमगिरे, अण्णासाहेब निमगिरे, सोमनाथ हजारे, किसन कर्चे, नितीन निमगिरे, दीपक निमगिरे, गणेश मुटेकर यांचे सहकार्य लाभले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page