कंदर : श्री बबनरावजी शिंदे स्कूलमध्ये मकरसंक्रांत निमित्ताने हळदी-कुंकू कार्यक्रम संपन्न
कंदर, दि. 21 (करमाळा-LIVE)-
मकर संक्रांतीच्या निमित्ताने कंदर येथील श्री बबनरावजी शिंदे इंग्लिश मेडिअम स्कूल मध्ये महिला पालकांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा सावित्रीबाई राऊत होत्या तर उपस्थित सर्व महिलांमध्ये तिळगुळ वाटप करुन हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये शंभर महिला सहभागी झालेल्या होत्या. यामध्ये प्रथम क्रमांक मोहिनी काकासाहेब शिंदे, द्वितीय क्रमांक प्रिया गणेश जाधव, तृतीय क्रमांक माधुरी संभाजी कळसाईत यांना स्कूलच्या वतीने बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन उपमुख्याध्यापिका तृप्ती राऊत व सर्व शिक्षिका यांनी केले तर सूत्रसंचालन योगिता बसळे यांनी केले प्रस्ताविक अदिती डोंगरे केले तर आभार इशिका मुलाणी हिने मानले.
- रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरीच्या जाचक अटी शिथिल करा- भाजप जिल्हा सचिव लक्ष्मण केकान
- करमाळ्यात मराठा कुणबी प्रकरणासाठी अडवणूक ; ऐजंट आणि अधिकाऱ्यांमध्ये मिलीभगत- युवासेनेचा धरणे आंदोलनाचा इशारा
- भाळवणीच्या तृप्ती वाघमारे चे नीट (NEET) परीक्षेत घवघवीत यश
- कुंभेजच्या बागल विद्यालयात केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धांचे आयोजन
- २०१४ ला २५७ चा मटका नव्हता, जनतेचा कौल होता! हे २०२४ लाही जनतेने दाखवून दिले ; विरोधकांना पाटील गटाचा “हाबाडा”