करमाळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

करमाळा, दि. २० (करमाळा-LIVE)-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळ्यायृ भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व आजी माजी पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवारी २२ जुलैला सकाळी १० ते ५ या दरम्यान गिरधरदास देवी सभागृहात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबीरासाठी महिला मोर्चाच्या राज्य उपाध्यक्षा रश्मी बागल, करमाळा अर्बन बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी, दत्तकला शिक्षण संस्थेचे रामदास झोळ आणि ज्येष्ठ नेते सूर्यकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
प्रत्येक रक्तदात्यास आयोजकांकडून आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. या शिबिरात शेकडो रक्तदात्यांनी स्वखुशीनं सहभाग नोंदवून “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” ही संकल्पना कृतीतून सिद्ध करावा असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस जितेश कटारिया यांनी केले आहे.