08/06/2025

आळजापूर: जि प शाळेचा ‘माझ्या लाडीचं झाड’ एक स्तुत्य उपक्रम; गटविकास अधिकारी मनोज राऊत

0
IMG-20230113-WA0014.jpg

करमाळा, दि. 13 (करमाळा-LIVE)-
आळजापूच्या जि प प्राथमिक शाळेने राबविलेला “माझ्या लाडीचं झाड” हा उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी व्यक्त केले.

राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने आळजापूर शाळेस दादासाहेब केवारे भाऊसाहेब यांनी आठ हजार रूपये किमतीची झाडे त्यांची कन्या भक्ती दादासाहेब केवारे या लाडीच्या नावाने भेट दिली. गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या हस्ते शाळेत या लाडीच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्या वैशालीताई केवारे ह्या होत्या. राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त शाळेतील मुलींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले कार्यक्रमसाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश गपाट, दत्तात्रय टेंबाळे, सदस्य विनोद नवले, दादासाहेब केवारे, बंटी कुंभार, गौतम गायकवाड, माधव रोडे, जयश्री गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या निगुडे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक लहू चव्हाण यांनी मानले

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page