October 9, 2026

जेऊरच्या लोकमंगल पतसंस्थेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

0
IMG-20230113-WA0046.jpg

जेऊर, दि. 13 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर येथील लोकमंगल सहकारी पतसंस्थेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतसंस्थेचे शाखाधिकारी संदीप शिंदे यांनी केले. यावेळी दोन्ही महापुरुषांनी केलेल्या कार्याचा उजाळा देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मेहता मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी संस्थेचे सभासद तावस्कर सर व तावस्कर मॅडम तसेच मेहता मॅडम, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष विजया कर्णवर, संस्थेचे सल्लागार डॉ. हनुमंत निर्मळ, सल्लागार बेरे सर, सल्लागार बाबुराव कळसाईत, सल्लागार सूर्यभान सरडे, विजयकुमार मंडलेचा, तसेच आरोग्य विभागाचे डॉ. तुषार कुर्डे आदि उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page