08/06/2025

जर वर्षी प्रमाणे यावर्षीही जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने इफ्तार पार्टीचे आयोजन

0
IMG-20240401-WA0088.jpg

जेऊर, दि. १ (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने रमजान पवित्र महिन्यानिमित्त आलिफ मस्जिद व इंदिरानगर मस्जिद येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले.

यावेळी पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके म्हणाले की, संभाजी ब्रिगेड ही संघटना सर्व जाती धर्मातील लोक एकत्रित घेऊन चालणारी अशी एकमेव संघटना आहे व जाती जातीत तेड निर्माण न करता सर्व जातीतील लोकांना एकत्रित घेऊन काम करणारी व विचारधारेवर सर्व समाज बांधवांचं संघटन करणारी संघटना आहे व समाज समाजात जातीय दोष न करता समाजात जातीय सलोखा राखण्याचे काम कित्येक वर्षापासून संभाजी ब्रिगेड ही संघटना करत आहे.

यावेळी ठाकरे गटाचे तालुका उपप्रमुख दादासाहेब थोरात, बाळासाहेब झोळ, बालाजी गावडे, निलेश पाटील, सुहास पोळ, अतुल निर्मळ, पांडुरंग घाडगे, पिंटू जाधव, आदिनाथ माने, अजित उपाध्ये, महेश कांडेकर, अविनाश घाडगे, हेमंत शिंदे, किशोर कदम, जयकांत गावडे, विजयकांत गावडे उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page