जेऊरच्या हर्षवर्धन वाघमारेची एमबीबीएस (MBBS) साठी निवड ; आमदार नारायण आबा पाटील यांनी केला सन्मान

जेऊर, दि. २९ (करमाळा-LIVE)-जेऊरच्या हर्षवर्धन वाघमारेची एमबीबीएस निवड झालेली आहे.
जेऊर येथील हर्षवर्धन पांडुरंग वाघमारे याने नीट परीक्षेत यशस्वी होऊन पहिल्याच प्रयत्नात एमबीबीएस साठी प्रवेश निश्चित केल्या बद्दल त्याचे आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार आबा पाटील यांनी हर्षवर्धन याचे कौतुक करून पाठीवर कौतुकाची थाप टाकली.
विशेष म्हणजे त्याने हे यश पहिल्याच प्रयत्नात मिळवले असून त्याची अहिल्यानगर येथील डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील मेडीकल कॉलेज मध्ये प्रवेश निश्चित झाला आहे.
हर्षवर्धन याचा मोठा भाऊ उदयराज हा देखील डेरवन (चिपळूण जि. रत्नागिरी) येथे एमबीबीएस शिक्षण पूर्ण करीत आहे. एकच कुटूंबातील दोघेजण एमबीबीएस साठी निवड झाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
हर्षवर्धन हा भारत हायस्कूल जेऊर येथील मल्लखांब प्रशिक्षक आणि मध्यामिक शाळा शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित करमाळा सचिव आणि पांडुरंग वाघमारे यांचा मुलगा आहे. त्याने हे यश मिळविलेल्या बद्दल लातूर येथील आरसीसी क्लास चे प्रा. शिवराज मोटेगावकर यांनी ही सत्कार केला.
त्याच्या या यशाबद्दल आमदार नारायण आबा पाटील. पंचायत समितीचे सभापती अतुल भाऊ पाटील, माजी सभापती गहिनीनाथ ननवरे, युवानेते जेऊर पृथ्वीराज पाटील, राजू आणा पाटील, भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अनिलकुमार गादिया, सचिव प्रा अर्जुनराव सरक, पंचायत समितीचे माजी सदस्य सुनिल तळेकर, जेऊर हायस्कूल मधील शिक्षक पंचक्रोशीतील नागरिकांनी अभिनंदन केले आहे आहे.