मंडळ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने बारा गावच्या तलाठ्यांनी थाटले जेऊर मध्ये खाजगी कार्यालय ; नागरिकांची होतेय गैरसोय- आनंद मोरे



करमाळा, दि. 10 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर येथे मंडळ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने बारा गावच्या तलाठ्यांनी जेऊर येथे सर्कल कार्यालय शेजारीच खाजगी जागेत तलाठी कार्यालय थाटले आहे. ह्यामुळे लोकांची गैरसोय होत आहे हे जर थांबले नाही तर मनसे रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असा इशारा मनसे विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष आनंद मोरे यांनी दिला.
करमाळा तालुक्यातील जेऊर हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे परिसरातील गावच्या तलाठ्यांनी एकत्र मिळून मंडळ अधिकारी कार्यालय मध्ये व शेजारी एक खाजगी जागेमध्ये कार्यालय थाटून तेथूनच बारा गावचा कारभार होत आहे हे बारा तलाठी आपापल्या गावच्या कार्यालया मध्ये उपलब्ध नसतात प्रत्येक गावातील नागरिक, वयोवृद्ध, अपंग अशिक्षित नागरिक यांना याचा नाहक त्रास होत असल्याच्या तक्रारी मनसे कडे आल्या असून एका आठवड्यात जर प्रत्येक तलाठी आपापल्या गावातील कार्यालय मध्ये थांबले नाही तर जेऊर येथील तसेच प्रत्येक गावातील कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला.
ग्रामीण भाग मध्ये प्रवास करण्यासाठी वाहणे कमी असून एका कामा साठी नागरिकांचा दिवस वाया जात आहे. त्यांचे खाजगी कार्यालय एक तर पाहिल्या मजल्यावर असून वयोवृद्ध नागरिक तसेच अपंग नागरिक यांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे हे लक्ष्यात घेऊन प्रशासनाने लवकरात लवकर खाजगी कार्यालय बंद करून सर्व तलाठ्यांना आपापल्या गावातील कार्यालयात बसवावे असे नाही झाले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाला सामोरे जावे असा इशारा मनसे विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष आनंद मोरे यांनी दिला.

- भारत प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील व भेटकार्ड
- सोलापूर सामाजिक वनीकरण विभागाकडुन आयोजित स्पर्धेत जेऊरच्या भारत हायस्कूलची आरूषी बादल प्रथम तर शिवानी कुंभार तृतीय
- स्वतःचा कारखाना विकणाऱ्या माजी आमदार शिंदे आणि त्यांच्या गटाने आदिनाथची काळजी करू नये- पाटील गट
- जेऊर येथील ओंकार पोळ याचे प्रथम पुण्यस्मरण ; केम व शेटफळ येथे विद्यार्थ्यांना भोजन व शालेय साहित्यांचे वाटप
- कोर्टीच्या सरपंच भाग्यश्री नाळे-मेहेर यांना ग्रामररत्न सरपंच पुरस्कार जाहीर