करमाळा विश्व हिंदू परिषद प्रखंडाची जेऊर येथे बैठक संपन्न

जेऊर, दि. १० (करमाळा-LIVE)-
विश्व हिंदू परिषद षष्ठीपुर्ती निमित्त करमाळा प्रखंडाच्या वतीने जेऊर येथे आज रविवार दि. ८ सप्टेंबर रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीमध्ये विश्व हिंदू परिषदेची स्थापना, उद्दिष्ट, विविध आयामा मार्फत चालवली जाणारी सेवा कार्य, संस्कार केंद्र, धार्मिक व सामाजिक कार्य याविषयी माहिती विश्व हिंदू परिषदेचे संतोष वाळुंजकर यांनी उपस्थितांना दिली.
या बैठकीच्या दुसऱ्या सत्रामध्ये करमाळा प्रखंडातील कार्याचा आढावा व नवीन कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आल्या. त्याच बरोबर प्रखंड समितीच्या विविध जबाबदाऱ्या कार्यकर्त्यांना देण्यात आल्या.
यावेळी विश्व हिंदू परिषद करमाळा प्रखंड सहमंत्री पदी नवनाथ शिंदे, बजरंग दल प्रखंड संयोजक पवन कोठारी, सहसंयोजक स्वप्निल चव्हाण, सहसंयोजक नागेश वाळुंजकर, सुरक्षा प्रमुख म्हणून ऋषिकेश महामुनी, बलोपासना केंद्रप्रमुख यश जाधव, साप्ताहिक मिलन प्रमुख रामेश्वर सूर्यवंशी, वीरेंद्र मगर सहसंयोजक, करण आलाट गोरक्षप्रमुख करमाळा शहर, प्रशांत जगदाळे गोरक्षा सहप्रमुख, सत्यजित बारकडे केम शहर संयोजक, योगेश ताकमोगे कोर्टी भाग संयोजक म्हणून यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या.
या बैठकीसाठी बजरंग दलाचे सोलापूर विभाग संयोजक ऋषिकेश चव्हाण, पंढरपूर जिल्हा सहसंयोजक नाना तकटे, करमाळा, जेऊर, शेलगाव, वांगी, उंदरगाव, वाशिंबे, हिंगणी, पांडे, उमरड, रोसेवाडी, निमगाव, कुंभेज इत्यादी गावातून पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकी च्या शेवटी चहापाणी व अल्पोपहार देऊन समारोप करण्यात आला.