करमाळ्यात ‘संविधान मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न
करमाळा, दि.२१ (करमाळा-LIVE)-
जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने करमाळा येथील शासकीय औद्यौगिक प्रशिक्षण संस्थेमधे “संविधान मंदिर लोकार्पण” सोहळा पार पडला असून, मंचाचे लोकार्पण भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते आभासी पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्राच्या ४३४ आयटीआय संस्थामध्ये पार पडला.
याप्रसंगी प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ पत्रकार डॉ. बाबुराव हिरडे व यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे गणेश करे-पाटील यांच्या समवेत पार पडला.
यावेळी संविधानाचे महत्त्व प्रशिक्षणार्थ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न मान्यवर व त्यांच्याद्वारे करण्यात आला. संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करण्याची भारताच्या सार्वभौम लोकशाहीसाठी अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन अॕड हिरडे यांनी केले, तर भारताचे सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता, संविधान लिहिण्याची गरज व त्यातील प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी असणारी सुरक्षितता, बंधुता यांची चर्चा प्रा. करे-पाटील यांनी केली.
यावेळी बुद्धाचार्य प्रशांत कांबळे, लक्ष्मण भोसले यांनीही प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे प्रथम ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते संस्थेमध्ये संविधान मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजेंद्र आवडे यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कट्टीमनी सर यांनी केले. तर माने सर यांनी आभार व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यास परदेशी सर, साठे सर, मनेरी सर, सूर्यपुजारी मॅडम, उंटवाल सर, शिरसट सर, भोयर सर, गुरव सर, शिंदे सर इतर कर्मचारी श्री महाडिक व श्री शेख या सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.