18/12/2024

देशसेवेसाठी समर्पित सैनिकांचा सन्मान करणारे नेतृत्व म्हणजे ‘आमदार संजयमामा शिंदे’

0
IMG-20240818-WA0015.jpg

करमाळा, दि. १८ (करमाळा-LIVE)-
आजी-माजी सैनिक कल्याणकारी संघटनेसाठी करमाळा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी मंजूर करून घेतलेल्या कारगिल भवन या वास्तूचे भूमिपूजन दि.१६ ऑगस्ट रोजी आमदार संजयमामांच्या हस्ते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत व संघटनेचे सर्व सदस्य,वारसदार सदस्य यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक संपन्न झाला.

यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष अक्रुर शिंदे म्हणाले की, आम्हा सर्वांचा ऊर अक्षरशः अभिमानाने व कौतुकाने भरून आला. कारण संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात प्रथम आम्हा सैनिकांसाठी हक्काचे कारगिल भवन, त्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देणारे मामा हे आजतरी एकमेव आमदार ठरलेले आहेत. या निमित्ताने मी इतकंच म्हणेन की, मामांसारखे कर्तबगार आमदार प्रत्येक मतदारसंघाला लाभावेत. त्यांच्या हातून आम्हा सैनिकांच्या देशसेवेचे सार्थक व्हावे !

या कामी आमच्या संघटनेला करमाळा पालिकेचे मुख्याधिकारी महेश तपसे, नगररचनाकार शशांक भोसले, अभियंता अक्षय वाघमारे, तहसीलदार शिल्पा ठोकडे, यशकल्याणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील, सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता के.एम.उबाळे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, संजयमामांचे समर्थक व मकाईचे माजी संचालक विवेक येवले, कॉन्ट्रॅक्टर प्रवीण शहाणे आदींचे बहुमोल सहकार्य लाभले हे नमूद करणे आवश्यक आहे.

या समारंभास राज्य त्रिदल सैनिक सेवा संघाचे संस्थापक-अध्यक्ष अंकुश खोटे, परंडा तालुका माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष संभाजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष भरत अवताडे, जिल्हा उपाध्यक्ष आशपाक जमादार, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड, लिंबेवाडी सरपंच किरण फुंदे, श्री देवीचामाळचे माजी उपसरपंच अनिल पवार, कुंभेजचे बाबासाहेब माळी, संघटनेचे उपाध्यक्ष रवींद्र सव्वासे, सचिव बिभीषण कन्हेरे, सहसचिव किरण ढेरे, निलंगे काका व संघटनेचे सर्व सदस्य, वारसदार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page