17/12/2024

करमाळा तालुक्यासाठी पाच कोटींचा निधी मंजूर- आमदार संजयमामा शिंदे यांची माहिती

0
images-64-2.jpeg

करमाळा, दि. ११ (करमाळा-LIVE)-
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील तरतुदीतून लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविणे (लेखाशीर्ष २५१५ १२३८ ) या योजनेंतर्गत महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभाग, शासन निर्णय क्र. विकास- २०२४/प्र.क्र.२१५/योजना-६, १० सप्टेंबर, २०२४ नुसार करमाळा तालुक्यासाठी पच कोटींचा निधी मंजूर झाला असून या निधीमधून ग्रामीण भागातील महत्त्वाचे रस्ते मजबुतीकरण करणे, सभामंडप बांधणे, पेविंग ब्लॉक बसविणे, व्यायाम शाळा बांधणे, वॉल कंपाऊंड बांधणे, मैदान दुरुस्ती करणे, गावांतर्गत व वाडीवस्तीवर रस्ते करणे, सामाजिक सभागृह बांधणे, पाणीपुरवठा सोय करणे ,विद्युतीकरण करणे, गटर्स बांधणे आदी कामे केली जाणार असून मतदारसंघातील ९८ गावातील कामे या निधीमधून केली जाणार आहेत.

या निधीमधून लव्हे, कोळगाव, हिवरे, अर्जुननगर, सौंदे, रिटेवाडी, कंदर, वडगावं दक्षिण,हिवरवाडी, देवळाली, विहाळ, कोंढेज, भाळवणी, निलज, सालसे, सोगाव पश्चिम, शेलगाव क, केडगाव, म्हसेवाडी, आळजापूर, बिटरगाव श्री, घोटी, वरकटणे, पांडे, सातोली, गुळसडी, राजुरी, वरकुटे, मांजरगावं, पुनवर, बाळेवाडी, गोयेगाव, दहिगावं, बिटरगाव वांगी, फिसरे, कामोणे, कुंभारगाव, सावडी ,कोर्टी, भोसे, पिंपळवाडी, साडे ,पारेवाडी, खातगाव नं.2, निंभोरे, देवीचामाळ, मांगी, केतुर नं.1, केतुर नं.2, कुंभेज, वांगी नं.2, भालेवाडी, करंजे, देलवडी, पांगरे, गौंडरे, शेलगावं (वां), लिंबेवाडी, पाथर्डी, अकुलगाव, कन्हेरगाव, पापनस, लहू, लोणी, चिंचगाव ,बारलोणी, गवळेवाडी, उपळवटे, शिंगेवाडी, चोभेपिंपरी, अंबड ,तडवळे, दहिवली, कुर्डूवाडी, रोपळे, भोसरे, घाटणे, वडाचीवाडी, ढवळस, पिंपळखुटे, कुर्डू, कव्हे, नाडी, शिंदेवाडी, सापटणे, भोगेवाडी, महादेववाडी, रिधोरे या ९८ गावातील विकास कामे या निधीमधून होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page